सध्या सुरू असलेल्या क्रिकेट विश्वचषकाच्या सामन्यांमध्ये भारताचे क्रिकेटपटू कशी चमक दाखवणार आणि प्रतिस्पर्ध्यांना नमवून चषक आपल्याकडे खेचून आणणार का, याची उत्कंठा शिगेला पोहोचली असतानाच क्रिकेटवेड्या पुणेकरांना अभिमान वाटेल अशी आणखी एक गोष्ट घडली आहे. जगभरातील क्रिकेटचा समृद्ध वारसा जतन करणा-या ‘ब्लेडस् ऑफ ग्लोरी’ या पुण्यातील क्रिकेट संग्रहालयाने गूगलच्या ‘आर्टस अँड कल्चर’ या विशेष ‘ऑनलाईन फ्लॅटफॉर्म’वर स्थान मिळवले आहे. त्यामुळे जगभरातील क्रिकेटप्रेमींना घरबसल्या थ्री-डी स्वरूपात हे संग्रहालय पाहता येणार आहे. गुगलच्या https://goo.gle/2KrC9sC या लिंकवर जाऊन आपण जणू या संग्रहालयातच उपस्थित आहोत असा आगळावेगळा अनुभव क्रिकेटप्रेमींना घेता येणार आहे.

स्वतः उत्तम क्रिकेटपटू असलेले क्रिकेटप्रेमी रोहन पाटे यांनी २०१२ मध्ये पुण्यात सहकारनगरमधील स्वानंद सोसायटी येथे चार हजार चौरस फुटांच्या भव्य जागेत हे क्रिकेट संग्रहालय साकारले आहे. जागतिक क्रिकेटमधील संस्मरणीय सामने आणि मैदान गाजवलेल्या क्रिकेटपटूंनी वापरलेल्या वस्तूंचा दुर्मिळ खजिना या संग्रहालयात आहे. या संग्रहालयाचे उद्घाटन मास्टरब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या हस्ते करण्यात आले होते. गुगलकडून मिळालेल्या या बहुमानाबद्दल बोलत असताना रोहन पाटे म्हणाले, “या संग्रहालयाच्या गूगलच्या आर्टस् अँड कल्चर प्लॅटफॉर्मवर समावेश झाल्यामुळे पुण्याचे नाव पुन्हा एकदा जगाच्या नकाशावर आले आहे. जगभरातील क्रिकेटप्रेमींसाठी ही आनंदाची बाब असून प्रत्येक जण आता घरबसल्या हा संग्रह पाहण्याचा आनंद घेऊ शकेल.”

Ragging on two postgraduate students at BJ Medical College in Pune print news
धक्कादायक! पुण्यातील बी.जे. वैद्यकीय महाविद्यालयात पदव्युत्तरच्या दोन विद्यार्थिनींवर ‘रॅगिंग’
Balaji temple plot, CIDCO,
बालाजी मंदिर भूखंडाविरोधात याचिका, २५ एप्रिलला सुनावणी; सिडकोचा हरकतीचा मुद्दा फेटाळल्याचा दावा
Royal Enfield Bullet Fire On Road In pune Bullet catches fire due to extreme heat
पुणेकरांनो सावधान! पहिल्यांदा स्फोट, नंतर आग, नवी कोरी बुलेट भररस्त्यात जळून खाक; VIDEO होतोय व्हायरल
girl kidnap viman nagar
खंडणीसाठी विमाननगरमधून महाविद्यालयीन तरुणीचे अपहरण

सचिन तेंडुलकरने वापरलेल्या वस्तूंचा एक खास विभागच या संग्रहालयात आहे. तसेच भारताच्या क्रिकेट संघाचा कप्तान विराट कोहली याच्या नावाचाही खास कक्ष संग्रहालयात असून त्याचे उद्घाटन विराटच्याच हस्ते करण्यात आले होते. विव्हियन रिचर्ड्स, वसीम अक्रम, राहुल द्रविड, वीरेंद्र सेहवाग, ख्रिस गेलपासून केदार जाधवपर्यंत विविध राष्ट्रीय व आंततराष्ट्रीय क्रिकेटपटूंनी या संग्रहालयास भेट दिली आहे.