News Flash

पिंपरी-चिंचवड: दृष्टीहीन रीना पाटील बनल्या एक दिवसाच्या पोलीस आयुक्त!

ज्योती माने झाल्या अप्पर पोलीस आयुक्त

पिंपरी : दृष्टीहीन रीना पाटील यांना एक दिवसासाठी पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तपदाचा पदभार सोपवण्यात आला तर ज्योती माने यांना अप्पर पोलीस आयुक्तपदाचा पदभार देण्यात आला.

दृष्टीहीन रीना पाटील यांना एक दिवसासाठी पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तपदाचा पदभार सोपवण्यात आला तर ज्योती माने यांना अप्पर पोलीस आयुक्तपदाचा पदभार देण्यात आला. या विशेष सन्मानाने या दोघीही भारावून गेल्या होत्या.

रीना पाटील यांना आपल्या खुर्चीत बसवून त्यांना पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी सॅल्युट केला. तसेच पतीचं निधन झाल्यानंतर जिम ट्रेनर म्हणून काम करत असलेल्या ज्योती माने यांना अप्पर पोलीस आयुक्तांच्या खुर्चीवर बसवून अप्पर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे यांनी सल्युट केला. एक दिवसासाठी का होईना या सर्वोच्चपदी विराजमान होण्याचा मान मिळाल्याने या दोघीही भारावून गेल्या होत्या.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 26, 2021 9:50 pm

Web Title: blind reena patil becomes one day commissioner of police of pimpri chinchwad kjp 91
Next Stories
1 ‘दहावीचं वर्ष महत्वाचं, चांगला अभ्यास कर’, अजित पवारांचा विद्यार्थिनीला सल्ला
2 शेतकरी आंदोलन : एवढी टोकाची भूमिका केंद्र सरकारने घेऊ नये – अजित पवार
3 पुणे शहराचा पाणीपुरवठा जैसे थे
Just Now!
X