News Flash

पुण्यामध्ये आज १५ ठिकाणी रक्तदान शिबिर

माणसाशी रक्ताचे नाते जोडणारे असे रक्तदान हे श्रेष्ठ दान समजले जाते. देशातील रक्ताचा तुटवडा ध्यानात घेऊन अखिल भारतीय तेरापंथ युवक परिषदेने शनिवारी (६ सप्टेंबर) लक्ष

| September 6, 2014 02:05 am

माणसाशी रक्ताचे नाते जोडणारे असे रक्तदान हे श्रेष्ठ दान समजले जाते. देशातील रक्ताचा तुटवडा ध्यानात घेऊन अखिल भारतीय तेरापंथ युवक परिषदेने शनिवारी (६ सप्टेंबर) लक्ष दात्यांच्या रक्तदानाचे लक्ष्य डोळ्यासमोर ठेवले आहे. त्याचाच भाग म्हणून परिषदेच्या पुणे शाखेतर्फे शहराच्या विविध भागात १५ ठिकाणी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
‘तुमचं आमचं-नातं रक्ताचं’ हे रक्तदान महाशिबिराचे ब्रीद आहे. देशभरात ८०० केंद्रांसह अमेरिका, थायलंड, नेपाळ येथेही हे शिबिर होणार आहे. नियमित रक्तदान करणारे दाते असले तरी समाजाचा मोठा वर्ग अजूनही रक्तदानापासून दूर आहे. त्यांना या प्रवाहामध्ये सहभागी करून घेण्याचा मानस आहे. या रक्तदान शिबिरास पंतप्रधान नरेंद्र मोदी, गानसम्राज्ञी लता मंगेशकर, ‘आर्ट ऑफ लिव्हिंग’ चे प्रणेते श्री श्री रविशंकरजी, प्रसिद्ध अभिनेते कमल हसन आणि रेल्वेमंत्री सदानंद गौडा यांनी पाठिंबा दिला असल्याची माहिती तेरा पंथ युवक परिषदेच्या पुणे शाखेचे अध्यक्ष विनोद सेठिया यांनी शुक्रवारी दिली. या वेळी सचिव धर्मेद्र चोरडिया आणि प्रवीण चोरबेले उपस्थित होते.
पुण्यामध्ये अरिहंत प्रतिष्ठान (वडगाव शेरी), श्रीमती भिकुबाई मेनकुदळे पंचम िलगायत ट्रस्ट (गणेश पेठ), श्री आत्मवल्लभ भवन (सोलापूर बाजार), एमआयटी स्कूल ऑफ मॅनेजमेंट (पौड रस्ता), श्रीराम मंगल कार्यालय (खडकी), लोहगाव नागरी पतसंस्था (लोहगाव), सिंहगड कॉलेड रीडिंग हॉल (कोंढवा), एलोरा पॅलेस मंगल कार्यालय (बालाजीनगर), भारती विद्यापीठ (कात्रज), महावीर प्रतिष्ठान (सॅलिसबरी पार्क), माहेश्वरी सांस्कृतिक भवन (रविवार पेठ), हिंदू सांस्कृतिक संवर्धन मंच (नागपूर चाळ), मगरपट्टा, फ्लेम यासह चाकण येथील सुपर ऑटो इंडिया प्रा. लि. येथे सकाळी दहा ते सायंकाळी सहा या वेळात रक्तदान शिबिर होणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 6, 2014 2:05 am

Web Title: blood donation in pune
Next Stories
1 पोळ यांच्यावर कारवाईसाठी उच्च न्यायालयात याचिका
2 इंटरनेटच्या माध्यमातून घरबसल्या शिक्षण
3 विसर्जन मिरवणुकीतील उंचच उंच देखावे झाडांच्या मुळावर!
Just Now!
X