News Flash

पुणे: लोणावळ्यात खोल दरीत सापडला सॉफ्टवेअर इंजिनिअर तरुणीचा मृतदेह

चार दिवसांपूर्वी या तरुणीची बॅग येथे आढळून आली होती मात्र ती स्वतः बेपत्ता होती.

लोणावळा : अलिझा राणा या सॉफ्टवेअर इंजिनिअर तरुणीचा मृतदेह लायन्स पाईंट येथील खोल दरीत आढळून आला आहे.

गिरीस्थान असलेल्या लोणावळा येथील प्रसिद्ध लायन्स पाईंट येथे ३०० फूट खोल दरीत एका २४ वर्षीय सॉफ्टवेअर इंजिनिअर तरुणीचा मृतदेह आढळल्याचे खळबळ उडाली आहे. चार दिवसांपूर्वी या तरुणीची बॅग येथे आढळून आली होती मात्र ती स्वतः बेपत्ता होती. ही तरुणी दरीत पडली असावी या संशयावरुन काही स्थानिक ट्रेकर्सच्या मदतीने पोलिसांनी दरीत शोध घेतल्यानंतर रविवारी तिचा मृतदेह आढळून आला.

पोलिसांच्या माहितीनुसार, अलिझा राणा असे या तरुणीचे नाव असून ती मूळची हैदराबादची आहे. हिंजवडी येथील आयटीपार्कमध्ये एका सॉफ्टवेअर कंपनीत ती कामाला होती. ती गुरुवारी, १२ सप्टेंबर रोजी लायन्स पॉईंट येथे आली होती. त्याच दिवशी तिची बॅग या पर्यटन स्थळाच्या ठिकाणी आढळून आली होती. यामध्ये तिचे ओळखपत्र आणि मोबाईलफोनही होता. त्यावरुन पोलिसांनी तिच्या हैदराबादस्थित कुटुंबियांना याबाबत माहिती दिली आणि ती दरीच्या कड्यावरुन खाली कोसळली असल्याची शक्यता लक्षात घेऊन तिचा शोध सुरु केला.

अलिझाचा शोध घेण्यासाठी त्यांनी शिवदुर्ग या स्थानिक ट्रेकर्सच्या ग्रुपशी संपर्क साधला आणि शोधकार्य सुरु केले. खोल दरीत संततधार पावसात या ट्रेकर्सने आपले काम सुरु केले. दरम्यान, रविवारी दुपारी ३०० फूट खोल दरीत तिचा मृतदेह ट्रेकर्सना आढळून आला.

अलिझाचा मृतदेह हाती आल्यानंतर पोलिसांनी सांगितले की, “आम्ही या प्रकाराची घटनाक्रमानुसार चौकशी सुरु केली आहे. याक्षणी आम्ही कोणतीही शक्यता नाकारत नाही. चौकशी सुरू करताना अचानक मृत्यूच्या कारणांची नोंदही करण्यात आली आहे. अलिझाच्या मृत्यूचा उलगडा होण्यासाठी आम्ही तिला कामाच्या ठिकाणी ओळखत असलेल्या लोकांशी आणि तिच्या कुटुंबातील सदस्यांशीही बोलत आहोत.”

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 16, 2019 1:00 pm

Web Title: body of 24 year old woman techie found 300 feet inside gorge in lonavala aau 85
Next Stories
1 …म्हणून उदयनराजेंच्या प्रवेशाला मोदी आले नाहीत -मुख्यमंत्री
2 सत्यजित देशमुख भाजपात दाखल; मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत केला प्रवेश
3 मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर भीषण अपघात, ‘संचेती’मधील डॉ. केतन खुर्जेकर यांचा दुर्दैवी मृत्यू
Just Now!
X