15 October 2019

News Flash

पुण्यात बॉम्बसदृश्य वस्तू आढळल्याने खळबळ, बॉम्बशोधक पथक घटनास्थळी

पुण्यातील धायरी दळवीवाडी येथे बॉम्बसदृश्य वस्तू आढळल्याने एकच खळबळ

प्रतिकात्मक छायाचित्र

पुण्यातील धायरी दळवीवाडी येथे बॉम्बसदृश्य वस्तू आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे. घटनास्थळी बॉम्बशोधक पथक दाखल झाले असून बॉम्बसदृश्य वस्तूचा तपास करण्यात येत आहे.

पोलिसानी दिलेल्या माहितीनुसार, धायरी येथील दळवीवाडी येथील रस्त्याच्या कडेला पुणे महापालिकेच्या कचरा गोळा करणार्‍या व्यक्तींना ही संशयास्पद वस्तू सर्वप्रथम दिसली. दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास याबाबतची माहिती त्यांनी पोलिसांना दिली. त्यानंतर या घटनेची माहिती बॉम्बशोधक पथकाला देखील देण्यात आली. दरम्यान बॉम्बशोधक पथक घटनास्थली दाखल झाले असून ती वस्तू नेमकी काय आहे आणि कुठून आली याचा शोध घेतला जात असल्याची माहिती सिंहगड पोलिसांनी दिली. पुढील तपास सिंहगड पोलीस करत आहे.

First Published on January 10, 2019 4:36 pm

Web Title: bomb like suspicious things found in pune police on alert