पुणे कॅन्टोन्मेन्ट विधानसभा मतदार संघातील ‘घोरपडी व्हिलेज’ या शाळेमध्ये आमदार रमेश बागवे यांच्या आमदार स्थानिक विकास कार्यक्रमाअंतर्गत इयत्ता दहावीच्या तळागाळातील विद्यार्थ्यांसाठी ‘लोकसत्ता’मध्ये येणाऱ्या ‘यशस्वी भव’ मालिकेच्या पुस्तिकेचे वाटप करण्यात आले. या वेळी नगरसेवक अविनाश बागवे उपस्थित होते.
चिकाटी आणि कष्टाशिवाय निखळ यश मिळवणे अवघड आहे. विद्यार्थ्यांनी चिकाटीने अभ्यास करावा. चांगले गुण मिळवायच्या उद्देशाने अभ्यास केल्यास यश मिळेल. कमी गुण मिळाले तर खचून न जाता, प्रयत्न करत राहावेत, असे मत बागवे यांनी या वेळी व्यक्त केले. ‘लोकसत्ता’तर्फे दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी ‘यशस्वी भव’ ही अभ्यासमाला चालवण्यात येते. याचेच रुपांतर पुस्तिकेमध्ये करण्यात आले आहे. दहावीच्या बदललेल्या अभ्यासक्रमाचा समावेश पुस्तिकेमध्ये करण्यात आला आहे. याचा फायदा विद्यार्थ्यांसह शिक्षकांनाही होणार
आहे.
हा उपक्रम जूनपासून सुरू करण्यात आला. या कार्यक्रमास ‘लोकसत्ता’चे निवासी संपादक मुकुंद संगोराम, वितरण विभागाचे कार्यकारी व्यवस्थापक मिलिंद प्रभुघाटे, वितरण व्यवस्थापक संदीप उपाध्ये, पुणे शहर काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस विठ्ठल थोरात, सचिव बाळासाहेब घोडके, कार्यकर्ते अरविंद अंगीलवाल, प्रदीप परदेशी, क्लेमंट लाझरस आदी उपस्थित होते.

students draw class teacher sketch funny video
निरागस चिमुकल्यांनी काढले शिक्षिकेचे चित्र, विद्यार्थ्यांचा व्हिडीओ पाहून पोट धरून हसाल
Selection list of eligible students for NMMMS scholarship announced Pune
 ‘एनएमएमएमएस’ शिष्यवृत्तीसाठी पात्र विद्यार्थ्यांची निवड यादी जाहीर… किती विद्यार्थ्यांना मिळाली शिष्यवृत्ती?
student gave secret message to math teacher
विद्यार्थ्यांनी घेतली गणिताच्या शिक्षकाची परीक्षा! विद्यार्थ्यांची ‘ही’ युक्ती पाहून शिक्षक झाले थक्क! पाहा Video…
Loksatta anvyarth Institute like IIT Mumbai has very less campus placement figures for recruitment
अन्वयार्थ: ‘आयआयटी’चे रोजगारवास्तव