१८ हजार पुस्तके  दान; विद्यापीठाच्या ग्रंथसंग्रहात मौलिक भर

पुणे : इंग्रजी पुस्तकांच्या वाचनाची सवय पुणेकरांना लावणाऱ्या ब्रिटिश कौन्सिल लायब्ररीची पुस्तके  आता सावित्रीबाई फु ले पुणे विद्यापीठाच्या संग्रहात दाखल झाली आहेत. डिजिटल माध्यमात रूपांतरित होत असल्याने ब्रिटिश कौन्सिल लायब्ररीने १८ हजार पुस्तके  विद्यापीठाला दान के ली असून, विद्यापीठाच्या ग्रंथसंग्रहात मौलिक भर पडली आहे.

ब्रिटिश कौन्सिल लायब्ररी १९६०मध्ये पुण्यात सुरू झाली. इंग्रजी भाषेतील उत्तमोत्तम पुस्तकांचा संग्रह असलेल्या या लायब्ररीस पुणेकर वाचकांचा मोठा प्रतिसादही लाभत होता. जवळपास सहा दशके  ब्रिटिश कौन्सिल लायब्ररी पुणेकर वाचकांना सेवा देत होती. सुरुवातीला फग्र्युसन महाविद्यालयाजवळ असलेली ब्रिटिश कौन्सिल लायब्ररी दोन वर्षांपूर्वी शिवाजीनगरमध्ये स्थलांतरित झाली होती. मात्र आता लायब्ररी डिजिटल माध्यमात जात असल्याने संग्रहातील पुस्तके  सावित्रीबाई फु ले पुणे विद्यापीठाला देण्याचा निर्णय घेण्यात आला.

कु लगुरू डॉ. नितीन करमळकर म्हणाले, की विद्यापीठाशी असलेल्या संबंधांमुळे ब्रिटिश लायब्ररीने पुस्तके  देण्याबाबत विचारणा के ली होती. आम्ही त्याला आनंदाने प्रतिसाद दिला. विद्यापीठाच्या जयकर ग्रंथालयात लाखो पुस्तके  आहेत. मात्र ब्रिटिश लायब्ररीने १८ हजार पुस्तके  विद्यापीठाकडे सोपवण्याचा निर्णय घेतला आहे. १८ हजार पुस्तकांपैकी १४ हजार पुस्तके  विद्यापीठाच्या ताब्यात देण्यात आली आहेत. उर्वरित पुस्तके ही लवकरच दिली जाणार आहेत. इंग्रजी भाषेसह साहित्य, धर्म, विज्ञान-तंत्रज्ञान, कला-क्रीडा अशा विविध विषयांवरील पुस्तकांचा त्यात समावेश आहे. त्यामुळे अतिशय उत्तम दर्जाची आणि उत्तम स्थितीतील ही पुस्तके  आता विद्यापीठाच्या संग्रहात आल्याने विद्यापीठाचा संग्रह अधिक मौलिक झाला आहे. लिबरल आर्ट्ससारख्या अभ्यासक्रमांसाठी हा ग्रंथसंग्रह अतिशय उपयुक्त आहे.

स्वतंत्र ग्रंथालय

समाजशास्त्र संकु लामध्ये विद्यापीठाने नव्याने उभारलेल्या सुसज्ज ग्रंथालय इमारतीमध्ये ब्रिटिश लायब्ररीकडून देण्यात आलेली पुस्तके  ठेवण्यात आली आहेत. विद्यार्थी आणि अभ्यासकांना हा ग्रंथसंग्रह वापरता येईल, अशी माहिती डॉ. प्रफु ल्ल पवार यांनी दिली.