16 December 2017

News Flash

मैत्रीतील अबोल्यातून तरुणीवर ब्लेडने वार

तरुणाला अटक

पिंपरी चिंचवड | Updated: June 19, 2017 3:20 PM

आरोपी ओंकार राऊत

पिंपरी-चिंचवडमध्ये २० वर्षीय तरुणाने घराजवळच राहायला असणाऱ्या मैत्रीणीवर ब्लेडने वार केल्याची घटना घडली आहे. ओंकार राऊत असे हल्ला करणाऱ्या तरुणाचे नाव असून चिंचवड पोलिसांनी त्याला अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित तरुणी ही ओंकार राऊत (वय २० रा.लिंक रोड, पत्रा शेड झोपडपट्टी) याची मैत्रीण आहे. मात्र गेल्या काही महिन्यांपासून पीडित तरुणी ही ओंकार याच्याशी बोलत नव्हती. याच काराववरून काल सायंकाळी सातच्या सुमारास पीडित तरुणीला एकटीला पाहून ओंकारने तिच्यावर वार केले. लिंक रोड, पत्रा शेड,झोपडपट्टी परिसरातच हा सर्व प्रकार घडला. ओंकारने तरुणीच्याहातावर, मांडीवर आणि पोटावर ब्लेडने वार केले आहेत. या हल्ल्यात तरुणी गंभीर जखमी झाली असून तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

विशेष म्हणजे पीडित तरुणी (वय १८) आणि ओंकार राऊत याची मैत्री आहे. ते दोघेही शेजारी राहतात. घरच्यांनी दोघांना एकमेकांसोबत बोलायचे नाही, असे सांगितले होते. मुलीला तिच्या घरच्यांनी ओंकारसोबत बोलत असल्यामुळे मारहाण केली होती. त्यामुळे पीडित तरुणी ओंकारसोबत बोलणे टाळत होती, अशी माहिती खात्रीशीर सूत्रांकडून समजली आहे. ओंकार राऊत याला रात्री उशिरा चिंचवड पोलिसांनी अटक केली. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक राठोड करत आहेत.

First Published on June 19, 2017 3:17 pm

Web Title: boy blade attack on girl in pimpari chinchwad pune