News Flash

पवना नदीत बुडून १४ वर्षीय मुलाचा मृत्यू

शनिवारपासून मुलाचा शोध सुरु होता

पवना नदीत बुडून १४ वर्षीय मुलाचा मृत्यू

पुणे जिल्ह्यातील मावळमधील गहूंजे येथील पवना नदीत बुडून चौदा वर्षीय मुलाचा मृत्यू झाला आहे. त्याचा मृतदेह हा आज एनडीआरएफच्या पथकाने नदीतून बाहेर काढला. स्टर्लिंग सॅम्युअल संसारे असे मयत मुलाचे नाव आहे. स्टर्लिंग काल संध्याकाळी त्याच्या मित्रांसोबत पोहायला गेला होता.

१४ वर्षांचा स्टर्लिंग त्याच्या दोन मित्रांसह पोहण्यासाठी गहुंजे येथील पवना नदीत गेला होता. मात्र पोहताना अचानक स्टर्लिंग बुडाला. या घटनेची माहिती तात्काळ पोलिसांना देण्यात आली. त्यानंतर एनडीआरएफच्या जवानांना पाचारण करण्यात आले. काल रात्री उशिरापर्यंत स्टर्लिंगचा थांगपत्ता लागला नाही. त्यामुळे सकाळी शोधमोहीम सुरू करण्यात आली. यानंतर आज दुपारी स्टर्लिंगचा मृतदेह हाती लागला. ‘पवना नदीत मोठ्या प्रमाणावर पाणी सोडण्यात आले होते. त्यामध्ये पोहू न शिकल्याने स्टर्लिंग बुडाला असावा,’ असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 12, 2017 4:17 pm

Web Title: boy drown in pavana river at maval
Next Stories
1 देशाचे संरक्षण करणाऱ्या जवानांचा अभिमान वाटतो – सुभाष भामरे
2 गोरक्षेच्या नावाखाली धांगडधिंगा!
3 शिक्षणाची ‘पाऊलवाट’ रूंद करण्याबरोबरच ग्रामविकासाचा ध्यास
Just Now!
X