News Flash

लैंगिक सुखाची मागणी, अल्पवयीन मुलाने केली ४८ वर्षांच्या पुरुषाची हत्या

हवेली तालुक्यातील कोरेगाव मूळ येथे बापू केसकर (वय ४८) याचा मृतदेह परिसरातील जंगलात सापडला होता. केसकर याची हत्या केल्याचे शवविच्छेदनातून स्पष्ट झाले.

( संग्रहीत प्रतिकात्मक छायाचित्र )

पुणे जिल्ह्यातील कोरेगाव मूळ येथे ४८ वर्षांच्या पुरुषाची अल्पवयीन मुलाने हत्या केल्याची घटना समोर आली आहे. लैंगिक सुखाची मागणी केल्याने मुलगा संतापला आणि त्याने रागाच्या भरात हत्या केल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे.

हवेली तालुक्यातील कोरेगाव मूळ येथे बापू केसकर (वय ४८) याचा मृतदेह परिसरातील जंगलात सापडला होता. केसकर याची हत्या केल्याचे शवविच्छेदनातून स्पष्ट झाले. या प्रकरणी उरुळी कांचन पोलिसांनी गुन्हा दाखल करत तपासाला सुरुवात केली. अखेर हत्येचा उलगडा झाला असून या प्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली आहे.

पोलीस तपासात केसकरची हत्या एका अल्पवयीन मुलाने केल्याचे उघड झाले. अल्पवयीन मुलगा परिसरातील एका इमारतीच्या बांधकाम साईटवर काम करत होता. त्याची काही महिन्यांपूर्वी बापू केसकरशी ओळख झाली होती. बापू केसकर वारंवार त्या मुलाकडे लैंगिक सुखाची मागणी करायचा. अनैसर्गिक संभोगासाठी केसकर त्या मुलावर दबाव टाकायचा. यामुळे अल्पवयीन मुलगा संतापला. त्याने केसकरची हत्या करण्याचे ठरवले. शुक्रवारी संध्याकाळी त्याने केसकरला गावातील निर्जनस्थळी भेटायला बोलावले. तिथे केसकरची तीक्ष्ण हत्याराने वार करुन हत्या केली. या हत्या प्रकरणात आरोपी अल्पवयीन मुलाला मदत करणाऱ्या त्याच्या मित्रालाही पोलिसांनी अटक केली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 18, 2018 4:20 pm

Web Title: boy murdered a 48 year old man who reportedly sought sexual pleasures from him in koregaon mul
Next Stories
1 VIDEO : एटीएममधून मोदकाचा प्रसाद, पुणेकराचा भन्नाट शोध
2 वाहतूक नियमभंग करणाऱ्या २७९ जणांच्या पारपत्रांना अटकाव
3 चांदणी चौक उड्डाणपुलाच्या भूसंपादनासाठी वाहतूक प्रकल्पांचा निधी वळविला
Just Now!
X