News Flash

पुणे – लग्नास नकार; प्रियकराने अपहरण करुन प्रेयसीवर केले चाकूने वार

अपहरण करुन तिच्यावर चाकूने सपासप वार केल्याची घटना पुण्यात घडली आहे

(संग्रहित छायाचित्र)

लग्नास नकार दिल्याचा राग मनात ठेवून एका तरूणाने प्रेयसीचे अपहरण करुन तिच्यावर चाकूने सपासप वार केल्याची घटना पुण्यात घडली आहे. यामध्ये ती तरूणी गंभीर जखमी झाली आहे. त्या तरूणाला यामध्ये अन्य दोघांनी मदत केली होती. मुंढवा पोलिसांनी तिघांविरुद्ध खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे़. प्रसाद रमेश सोनवणे, नदीम शेख आणि चंदन चव्हांडके अशी गुन्हा दाखल केलेल्यांची नावे आहेत़.  हा प्रकार मुंढवा पुलापासून हडपसर मगरपट्टा सिटीदरम्यान गुरुवारी रात्री पावणे नऊ वाजता घडला़.

याबाबत पोलिसांनी सांगितले की, ही तरुणी २०११ मध्ये रामटेकडी येथे राहायला असताना तिच्या घरासमोर राहणाऱ्या प्रसाद सोनवणे याच्याबरोबर प्रेमसंबंध निर्माण झाले़ गेले. ७ ते ८ वर्षे त्यांचे प्रेमसंबंध होते़. दरम्यान ही तरुणी आपल्या कुटुंबासह वडकीनाला येथे राहायला गेले़. मागील चार ते पाच महिन्यांपासून प्रसाद या तरुणीला लग्न करु म्हणून मागे लागला होता़. दारु पिऊन तो तिला मारहाणही करुन लागला़. त्यामुळे तिने त्याच्याबरोबरचे सर्व संबंध तोडून टाकले़. तरीही तो तिला वारंवार फोन करीत़ तसेच ती कामाला असलेल्या ठिकाणी बाहेर येऊन थांबत असे.

८ ऑगस्टला ती सायंकाळी साडेसातला कामावरुन बाहेर पडल्यावर प्रसाद दोन मित्रासह बाहेर उभा होता़. त्याने तिला जबरदस्तीने रिक्षात बसायला लावले़. रिक्षा मगरपट्टा सिटीमध्ये गेल्यावर त्याने पुन्हा तिला माझ्याबरोबर लग्न कर असा आग्रह केला़. तिने नकार देताच त्याने आपल्याकडील चाकू काढून तिच्या छातीवर, पाठीवर सपासप वार केले़ या प्रकरणी मुंढवा पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 10, 2019 8:02 pm

Web Title: boyfriend attack girlfrind in pune nck 90
Next Stories
1 पुणे : राजीव गांधी प्राणीसंग्रहालयातील सिंहाचा मृत्यू
2 फेसबुकमुळे १५ दिवसांनी झाली वडील मुलाची भेट
3 पुणे-मुंबई रेल्वे १६ ऑगस्टपर्यंत बंद
Just Now!
X