16 October 2019

News Flash

प्रियकराने लग्नास नकार दिल्याने तरूणीची आत्महत्या

तरूणीच्या प्रियकराचा शोध पोलीस घेत आहेत

प्रियकराने लग्नाला नकार दिल्याने तरूणीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना पुण्यातल्या हडपसरमध्ये घडली आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. याप्रकरणी हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. आरोपी शेखर तुपेला अद्याप अटक झालेली नाही.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हडपसर येथील महादेवनगर भागात एका शाळेत तरूणी ही कराटे क्लाससाठी जात होती. त्यावेळी तिची शेखर तुपे या तरुणीशी ओळख झाली. या ओळखीचे कालांतराने प्रेमात रूपांतर झाले. त्यानंतर तरुणीने लग्नासाठी आरोपीकडे विचारले असता, त्याने लग्न करण्यास नकार दिला. यामुळे त्या तरुणीने घरातील किचनमध्ये गळफास घेतला. तिला जवळच्या रूग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. तसेच या प्रकरणातील आरोपी शेखर तुपेचा शोध घेतला जात असल्याचं सांगण्यात येतं आहे.

First Published on May 16, 2019 8:00 pm

Web Title: boyfriend refuses to marriage pune girl hung herself and commit suicide