News Flash

एकतर्फी प्रेमप्रकरणातून महिलेचा खून करणाऱ्या प्रियकराचा उपचारादरम्यान मृत्यू

काल महिलेला भर रस्त्यात अडवून तिच्या पोटात चाकू भोसकला होता

पिंपरी-चिंचवडमध्ये काल(शनिवार) एकतर्फी प्रेमप्रकरणातून एका विवाहित तरुणाने एका विवाहित महिलेचा भर रस्त्यात धरदार चाकूने भोसकून खून केल्याची धक्कादायक घटना घडली होती. महिलेवर हल्ला केल्यानंतर आरोपीने स्वतःच्या पोटात देखील चाकूने वार करीत आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता, यामुळे तो गंभीर जखमी झालेला असताना त्यास रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. अखेर ‘त्या’ गंभीर जखमी झालेल्या प्रियकराचा काल रात्री उशीरा उपचारदरम्यान मृत्यू झाला असल्याची  माहिती चिखली पोलिसांनी दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २९ वर्षीय महिलेवर आरोपी अरविंद गाडे (वय- ३०) याचे एकतर्फी प्रेम होते. यातूनच शनिवारी दुपारच्या सुमारास घरी परतत असताना अरविंदने या  महिलेचा रस्ता अडवून बोलण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, या महिलेने बोलण्यास नकार दिल्याने संतापलेल्या अरविंदने चाकू काढून महिलेच्या पोटात भोसकला होता. यानंतर त्याने स्वतः वर देखील चाकूने वार करून घेत आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. यामध्ये गंभीर जखमी झाल्याने त्याल रुग्णालयात दाखल करण्यता आले होते. अखेर काल रात्री उशिरा त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला अशी माहिती चिखली पोलिसांनी दिली.

दरम्यान, एकतर्फी प्रेम प्रकणामुळे दोन संसार उघड्यावर आले असून, आई आणि वडिलांपासून मुलं पोरकी झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. घटनेचा अधिक तपास चिखली पोलीस करत आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 2, 2020 9:18 am

Web Title: boyfriend who murdered a woman in a one sided love affair dies during treatment msr 87 kjp 91
Next Stories
1 अग्रलेखांतून ‘लोकमान्य’ विचारांचे मनोज्ञ दर्शन
2 सोमवारपासून राज्यात पावसाची शक्यता
3 लघु उद्योजक घायकुतीला
Just Now!
X