13 November 2019

News Flash

ब्रिटिश लायब्ररीतील जुन्या पुस्तकांची शनिवारी विक्री

पुस्तकांच्या सेलचा लाभ जरी ग्रंथालयाच्या सभासदांनाच घेता येणार असला, तरी नव्याने सभासद होऊ इच्छिणाऱ्यांसाठी सभासदत्वावर २०० रुपयांची सवलत ठेवली आहे.

| September 24, 2014 02:55 am

ब्रिटिश लायब्ररीत शनिवारी जुन्या पुस्तकांची सवलतीत विक्री करण्यात येणार आहे. मात्र या सवलतीचा लाभ केवळ ग्रंथालयाच्या सभासदांनाच घेता येणार आहे. शनिवारी सकाळी ११ ते सायंकाळी ६ या वेळात हा पुस्तकांचा ‘सेल’ सुरू राहील.
पुस्तकांच्या सेलचा लाभ जरी ग्रंथालयाच्या सभासदांनाच घेता येणार असला, तरी नव्याने सभासद होऊ इच्छिणाऱ्यांसाठी सभासदत्वावर २०० रुपयांची सवलत ठेवली असल्याची माहिती ग्रंथालयाने दिली आहे. मंगळवार ते शनिवार या दिवसांत ग्रंथालय सकाळी ११ ते सायंकाळी ७ वाजेपर्यंत तर रविवारी सकाळी ११ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत खुले राहते.

First Published on September 24, 2014 2:55 am

Web Title: british library sale books
टॅग Books,Sale