28 September 2020

News Flash

पुण्यात बहिण भावाचा नदीत पडून मृत्यू

ग्रामस्थांनी या दोघांना बाहेर काढले मात्र तोपर्यंत त्या दोघांचाही मृत्यू झाला होता

पुण्यातल्या आंबेगाव तालुक्यात असलेल्या काशिंबेग गावात पाण्यात पडून बहिण भावाचा मृत्यू झाला. घोडनदीवर कपडे धुण्यासाठी गेले असताना या दोघांचा मृत्यू झाला. प्रेम विजय पवार आणि काजल विजय पवार अशी या दोघांची नावं आहेत. प्रेम हा १० वर्षांचा होता तर काजल १४ वर्षांची होती.

पुण्याच्या विश्रांतवाडी येथून पोटाची खळगी भरण्यासाठी हे पवार कुटुंब एक महिन्याभरापूर्वीच काशिबेंग गावात आले होते. शेतीला आवश्यक असणारी खुरपी आणि इतर अवजारे तयार करण्याचे काम या दोघांचे आई वडील करतात.

चाकण येथील बाजारात विजय पवार हे पत्नीसह शनिवारी खुरपी विकण्यासाठी गेले. त्यावेळी मुलगी दिव्या, काजल, प्रेम, क्रिश, विजय आणि अनिल ही मुलं घरीच होती. दुपारी अनिल ला घरी ठेवून पाच ही बहीण-भावंडे कपडे धुण्यासाठी घोडनदीवर गेले. त्यावेळी कपडे धुत असताना काजल आणि प्रेमचा पाय घसरून नदीत पडले. ते बुडत असताना इतर बहीण-भावडांनी आरडाओरडा केला. ग्रामस्थांनी धाव घेत दोघांना बाहेर काढले, पण तो पर्यंत दोघांचा मृत्यू झाला होता.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 15, 2019 4:36 pm

Web Title: brother and sister drown in ghod river pune scj 81
Next Stories
1 महिलांच्या स्वच्छतागृहात ऑफिस बॉय ठेवायचा मोबाईल, विनयभंगाचा गुन्हा दाखल
2 तक्रार मागे घेण्यासाठी मागितली १० लाख रुपयांची खंडणी; गुन्हा दाखल
3 मॉलमध्ये विनामूल्य पार्किंग
Just Now!
X