पिंपरी-चिंचवडजवळील घोराडेश्वर येथे एका दिराने भावजयीचा गळा दाबून आणि डोक्यात दगड घालून खून केल्याची घटना उघडकीस आली आहे. भावजयीकडे आरोपी दिराने शरीर सुखाची मागणी केली होती. त्याला विरोध केल्याने तिचा गळा दाबून खून केला असल्याचं उघड झाल आहे.  या प्रकरणी आरोपीला तळेगाव पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीचे महिलेशी एकतर्फी प्रेम होते. रविवारी आरोपी महिलेला घेऊन घोराडेश्वर येथे देवदर्शनासाठी डोंगरावर गेला होता. महिलेला पुढे घडणाऱ्या घटनेची काहीच कल्पना नव्हती. निर्मनुष्य आणि दाट झाडीत गेल्यानंतर आरोपीने महिलेकडे शरीर सुखाची मागणी केली. मात्र, त्याला महिलेने विरोध केला. याचाच राग मनात धरून आरोपीने भावजयीचा गळा दाबून आणि डोक्यात दगड घालून खून केला आणि तेथून धूम ठोकली.

Employer killed owner for non-payment of wages
ठाणे : मजुरीचे पैसे दिले नाही म्हणून मालकाची चाकू भोसकून हत्या
A youth from Nalasopara committed suicide by consuming poison due to cyber fraud
सायबर भामट्यांनी घातला २ लाखांचा गंडा; वडील रागावतील म्हणून मुलाची आत्महत्या
T M Krishna loksatta editorial Controversy over Karnataka singer t m krishnan awarded by Sangeet kalanidhi puraskar
अग्रलेख: अभिजाताची जात
Bhandara Special Aloo Tamatar Rasa Bhaji Recipe
भंडाऱ्यातली बटाटा भाजी चवीला एकदम स्पेशल.. भंडारा स्पेशल भाजीची घ्या झणझणीत रेसिपी

दरम्यान, सोमवारी मयत महिलेच्या पतीने पोलिसात येऊन चुलत भावाने पत्नीसोबत घातपात केला असल्याचा संशय व्यक्त केला. पोलिसांनी तातडीने त्याला ताब्यात घेऊन विचारपूस केली. तेव्हा, त्यानेच भावजयीचा खून केला असल्याचं उघड झाले. याप्रकरणी आरोपीला याला तळेगाव पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.