22 September 2020

News Flash

प्रेयसीच्या लग्नाला विरोध करणाऱ्या विवाहित प्रियकराचा भावाने केला खून

दीड वर्षांपासून दोघांमध्ये प्रेमसबंध होते

तरुणाने बहिणीच्या माजी प्रियकराची हत्या केल्याची घटना पिंपरी चिंचवडमध्ये घडली आहे. विवाहित प्रियकराने प्रेयसीच्या लग्नाला विरोध केला होता. यामुळे संतापलेल्या प्रेयसीच्या भावाने प्रियकराचा खून केल्याची घटना पिंपरी-चिंचवडमध्ये घडली आहे. दिघी येथे ही घटना घडली. याप्रकरणी प्रेयसीच्या भावाला पोलिसांनी अटक केली आहे. युवक वाघमारे असं मृत प्रियकराचं नाव असून संतोष चौधरी असं आरोपीचं नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत युवक वाघमारेचे आरोपी संतोषच्या बहिणीसोबत गेल्या दीड वर्षापासून प्रेमसबंध होते. युवक वाघमारेने आपलं लग्न झाल्याचं प्रेयसीपासून लपवलं होतं. त्याला एक मुलगीदेखील आहे. युवकच्या पत्नीला यासंबंधी कळताच तिने प्रेयसिला याबाबत सांगितलं. तिने यासाठी आपल्या लग्नाचा व्हिडीओही व्हॉट्सअॅप स्टेटस ठेवला होता. आरोपी संतोषच्या कुटुंबियांचाही या प्रेमसंबंधाला विरोध होता. संतोष याने बहिणीला युवकशी न बोलण्याची ताकीद दिली होती.

संतोष आणि कुटुंबीय बिहारमधील मूळ गावी जाऊन बहिणीचा विवाह लावणार होते. युवक वाघमारेचा या लग्नाला विरोध होता. यासाठी त्याने प्रेयसीचं घर गाठलं आणि गोंधळ घालत सर्वांचा खून करेल अशी धमकी दिली. याच रागातून प्रेयसीच्या भावाने म्हणजे संतोष चौधरी याने युवकच्या डोक्यात लोखंडी रॉड घालून हत्या केली. हल्ल्यात युवकचा जागीच मृत्यू झाला. आरोपी संतोषला दिघी पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 5, 2019 7:33 pm

Web Title: brother killed boyfriend of sister opposing marriage
Next Stories
1 पवना नदीवरील केजुबाई धरण भागात शेकडो मासे आढळले मृतावस्थेत
2 हडपसरमध्ये पाच वर्षांच्या चिमुरडीवर लैंगिक अत्याचार; ४० वर्षीय आरोपी गजाआड
3 मुलाची आत्महत्या, धक्क्याने आईचाही मृत्यू; पिंपरीतील कुटुंबावर कोसळला दु:खाचा डोंगर
Just Now!
X