News Flash

बालेवाडी दुर्घटनाप्रकरणी बांधकाम व्यावसायिकाला अटक

स्लॅब कोसळून झालेल्या दुर्घटनेस जबाबदार असणाऱ्या एका बांधकाम व्यावसायिकाला पोलिसांनी अटक केली

बालेवाडीतील पार्क एक्सप्रेस गृहप्रकल्पातील तेराव्या मजल्यावरचा स्लॅब कोसळून झालेल्या दुर्घटनेस जबाबदार असणाऱ्या एका बांधकाम व्यावसायिकाला पोलिसांनी अटक केली. त्याला न्यायालयाने गुरुवापर्यंत (१८ ऑगस्ट) पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.
मृगांक कन्स्ट्रक्शनचे संचालक महेंद्र सदानंद कामत (वय ४१, रा. विज्ञाननगर, बावधन) असे अटक करण्यात आलेल्या बांधकाम व्यावसायिकाचे नाव आहे. बालेवाडी दुर्घटनेस जबाबदार असणारे बांधकाम व्यावसायिक अरविंद जैन, श्रवण अगरवाल, शामकांत शेंडे, कैलास वाणी यांचे जामीनअर्ज न्यायालयाने फेटाळून लावले आहेत, तर या प्रकरणी भावीन शहा, संतोष चव्हाण, ज्ञानेश्वर चव्हाण आणि श्रीकांत पवार यांना अटक करण्यात आली होती.
कामत याला अटक करण्यात आल्यानंतर मंगळवारी न्यायालयात हजर केले. तेराव्या मजल्यावरील स्लॅबचे काम कामत याच्या कंपनीमार्फत करण्यात येत होते. त्याने स्लॅब बांधण्यासाठी वापरलेले साहित्य कोठून आणले? या दृष्टीने तपास करायचा आहे. त्यामुळे कामत याला पोलीस कोठडी देण्याची विनंती सरकारी वकील मिलिंद दातरंगे यांनी केली. न्यायालयाने कामतला पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.

पसार झालेल्या बांधकाम व्यावसायिकांचा शोध सुरूच
बालेवाडीतील पार्क एक्सप्रेस गृहप्रकल्पातील स्लॅब कोसळून नऊ मजूर ठार झाल्याची घटना गेल्या महिन्यात २९ जुलै रोजी घडली होती. बांधकाम व्यावसायिक अरविंद जैन, श्रवण अगरवाल, शामकांत शेंडे, कैलास वाणी, प्रदीप कौसुंबकर, हंसल पारीख यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अद्याप ते पोलिसांना सापडले नाहीत. बालेवाडीतील दुर्घटनेस जबाबदार असणाऱ्या सहा आरोपींचा पोलिसांकडून शोध सुरुआहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 17, 2016 4:58 am

Web Title: builder arrested in balewadi slab collapse
Next Stories
1 ‘विकास आराखडय़ावर आमदारांच्या सूचना घेण्याचा भाजपचा नवा पायंडा’
2 मोक्याच्या ३९४ जागा मोबाइल कंपन्यांना आंदण
3 पुणे पोलिसांच्या सायबर लॅबचे उद्घाटन
Just Now!
X