पुण्यातील शनिवार पेठेतील प्रभात टॉकीज समोरील इमारतीच्या पहिल्या मजल्यावर सकाळी आग लागल्याची घटना घडली. या आगीत येथील तळमजल्यावरील मेडिकलचे दुकान खाक झाले. शॉर्ट सर्किटमुळे आग लागली असावी असा अंदाज अग्निशामक विभागाकडून व्यक्त करण्यात आला आहे. तर आगीच्या घटनेची माहिती मिळताच महापौर मुक्ता टिळक यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.
अग्निशामक विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवार पेठ प्रभात टॉकीज समोरील जोशी संकुलच्या पहिल्या मजल्यावर सकाळी पावणे नऊ वाजेच्या सुमारास मेडिकलच्या दुकानात आग लागली. या आगीच्या धुरामुळे इमारतीमधील नागरिकांना खाली येणे अशक्य झाल्याने जवळपास २५ जण टेरेसवर अडकले होते. अग्निशामक विभागाच्या सात गाड्याच्या मदतीने आग आटोक्यात आणण्यात आली. तसेच, टेरेस वरील नागरिकांना जवानांनी बीए सेट घालून सुखरूप खाली उतरवले.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on May 16, 2019 10:06 am