27 February 2021

News Flash

पुणे : घोरपडे पेठेतील इमारतीचा भाग कोसळला

घटनेत कोणतीही जीवितहानी नाही

पुण्यातल्या घोरपडे पेठ भागात असलेल्या इमारतीचा भाग कोसळल्याची घटना रात्रीच्या सुमारास घडली आहे. या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही अशी माहिती पुणे अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी दिली. अग्निशमन विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, घोरपडे पेठेतील राष्ट्रभूषण चौकातील तीन मजली इमारतीचा काही भाग कोसळला असल्याची माहिती काल रात्री साडेअकरा वाजण्याच्या सुमारास मिळाली.

या घटनेची माहिती मिळताच काही मिनिटात घटनास्थळी अग्निशमन दलाने धाव घेतली. त्या ठिकाणी पोहोचल्यानंतर तिसर्‍या मजल्यावर सात कुटुंब राहत होते. त्या सर्वाना खाली आणण्यात आले असून लाकडी आणि मातीचं जुनं बांधकाम आहे. त्यामुळे इमारतीचा काही भाग पडला असावा. तसेच आता पुणे महापालिकेचा पाडकाम विभागामार्फत धोकादायक भाग पाडण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 29, 2019 9:00 am

Web Title: building part collapse in ghorpade peth pune scj 81
Next Stories
1 युतीने दहा जागा न दिल्यास शंभर जागा लढवणार!
2 पक्षांतरासाठी राष्ट्रवादीच्या नेत्यांवर दबाव
3 कोकण, विदर्भ, मध्य महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा अंदाज
Just Now!
X