29 May 2020

News Flash

बुलाती है मगर जाने का नहीं…, पिंपरी-चिंचवड पोलिसांची TikTok व्हिडीओतून थट्टा

संबंधितावर होणार पोलीस कारवाई

टिक टॉक अ‍ॅपवरून एकएकापेक्षा एक भन्नाट व्हिडीओ बघायला मिळतात. टिक टॉक कलाकारांचाही एक चाहता वर्ग निर्माण झाला आहे. ‘टिक टॉक’च्या माध्यमातून अनेक जण स्वतःतील कलागुणांना लोकांपर्यंत पोहोचवत आहेत. पण, याची दुसरी बाजूही समोर येऊ लागली आहे. सध्या टिक टॉकसह सगळीकडे “बुलाती है मगर जाने का नहीं” या संवादाचा ट्रेंड सुरू आहे. यावरून टिक टॉकवर भरमसाठ व्हिडीओ पडत आहे. मात्र, एकानं थेट पिंपरी चिंचवड पोलिसांची थट्टा केली आहे. याची दखल पोलिसांनी घेतली असून संबंधितावर कारवाई करण्यासाठी पाऊल उचललं आहे.

इंदुरीकर महाराजांसह अनेक संवाद सध्या टिक टॉक ऍप सर्वात जास्त पाहिले जातात. असे असंख्य संवाद जोडून व्हिडिओ व्हायरल केले जात आहेत. जास्त लाईक मिळवण्यासाठी ही धडपड तरुण-तरुणी करताना दिसत आहेत.

पिंपरी-चिंचवडमधील पोलीस ठाणे किंवा पोलिसांची व्हॅनचं मोबाईलमध्ये व्हिडिओ काढून त्याला ‘बुलाती है मगर जाने का नहीं’ असा संवाद जोडून व्हायरल केलं जातं आहे. काही हजार आणि शेकडो लाईकसाठी पोलिसांची थट्टा करणारा हा व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल झाल्यानंतर याची चर्चा सुरू झाली.

पोलीस व्हॅन आणि पिंपरी चिंचवड पोलीस ठाण्याचं चित्रीकरण करून त्याचा टिक टॉक व्हिडीओ बनवण्यात आला आहे. या व्हिडीओला बुलाती है मगर जाने का नहीं, या संवादाची जोड देण्यात आली आहे. यासंदर्भात बोलताना पिंपरी चिंचवडचे अप्पर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे म्हणाले, “संबंधित व्हिडिओ हे सायबर सेलच्या अधिकाऱ्यांना पाठवण्यात आले आहेत. त्याची चौकशी करून संबंधित व्यक्तीवर योग्य ती कारवाई करण्यात येईल,” अशी माहिती त्यांनी दिली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 19, 2020 9:39 am

Web Title: bulati hai magar jane ka nahi tik tok video made on pune pune bmh 90 kjp 91
Next Stories
1 छत्रपती शिवेंद्रराजे भोसले यांची प्रकृती बिघडली; उपचारासाठी मुंबईला हलवलं
2 विद्यापीठात पुढील वर्षी इंडो-फ्रेंच नॉलेज समिट
3 श्री शिवजयंतीनिमित्त जिल्हा प्रशासनाची तयारी पूर्ण
Just Now!
X