मोकाट वळू ने एका जेष्ठ नागरिकाला उचलून फेकल्याने त्या नागरिकाचा जागीच मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना पिंपरी-चिंचवड शहरात घडली आहे. आनंद सिंग अस मृत्यू झालेल्या जेष्ठ नागरिकाचे नाव आहे. हा सर्व प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला आहे.
पिंपरी चिंचवड मधील बोपखेल येथे रस्त्याच्या कडेला वळू बसलेला होता. तेव्हा ७९ वर्षीय मयत जेष्ठ नागरिक आनंद सिंग हे त्याच्या जवळून जात होते. अचानक काही कळायच्या आत त्यांना वळू ने पाठीमागून जोरात धडक दिली, त्यामुळे ते हवेत फेकले गेले आणि जोरात जमिनीवर आदळले.यात ते गंभीर जखमी झाले,त्यांना मुका मार लागला होता. नागरिकांनी त्यांना रुग्णालयात घेऊन गेले परंतु, त्यांच्या उपचारापूर्वीच मृत्यू झाला. हा सर्व प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला आहे. या घटनेमुळे शहरातील मोकाट जनावरांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on April 7, 2019 3:21 pm