News Flash

पिंपरी-चिंचवडमध्ये एसटी बसचा भीषण अपघात; एकाचा मृत्यू तीनजण जखमी

बस चालकाला पोलिसांनी घेतले ताब्यात; गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू

पिंपरी-चिंचवडमधून जाणाऱ्या नाशिक- पुणे या महामार्गावर एसटी बस आणि ट्रकचा आज (बुधवार) पहाटे भीषण अपघात झाला. या घटनेत एसटी बस वाहकाचा जागीच मृत्यू झाला असून तीन प्रवासी जखमी झाले आहेत. पहाटे धुक्यांमुळे रस्त्याच्या कडेला उभा असलेला ट्रक न दिसल्याने, भरधाव वेगातील बस थेट ट्रकला पाठीमागून धडकल्याने हा भीषण अपघात घडला. याप्रकरणी बस चालकाला भोसरी पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.

अंबादास दिनकर खेडकर (वय-३२) असे मृत्यू झालेल्या बस वाहकाचे नाव आहे. तर गंगाराम दिनकर सानप  असे बस चालकाचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, धुळे बस आगारातील बस (एम.एच-२० बी.एल-३४२६)  साक्रीहुन पुण्याच्या दिशेने निघाली होती. दरम्यान पहाटे साडेचार वाजेच्या सुमारास नाशिक-पुणे महामार्गावर भोसरी पोलीस ठाण्यासमोर रस्त्याच्या कडेला उभा असलेल्या ट्रकला पाठीमागून भरधाव वेगात असलेली ही बस धडकली.  या भीषण अपघातात बस वाहक अंबादास यांचा जागीच मृत्यू झाला तर तीन प्रवासी जखमी झाले आहेत. या घटनेप्रकरणी बस चालकाला दोषी धरून त्याच्यावर गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे. घटनेचा अधिक तपास भोसरी पोलीस करत आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 20, 2019 1:45 pm

Web Title: bus accident on pune nashik highway msr 87
Next Stories
1 कुख्यात गुंड महाकालीचा भाऊ पुणे जिल्ह्यातून तडीपार
2 मुंबई-पुणे रेल्वेसेवा सुरळीत होण्यासाठी आणखी दोन महिने प्रतीक्षा
3 सायकल निधीचीही पळवापळवी
Just Now!
X