आळंदीत एसटी वाहकाने रिक्षा चालकाला लोखंडी रॉडने मारल्याची घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. रिक्षावाल्याने कट बसला कट मारला त्याच रागातून कंडक्टरने ही कृती केल्याचे बोलले जाते आहे. रिक्षा चालकांचा उद्धटपणा कायमच सुरु असतो, मात्र बसच्या वाहकाने अशाप्रकारे कायदा हाती घेणे गैर आहे असे बोलले जाते आहे. याप्रकरणी अद्याप कोणतीही तक्रार पोलीस ठाण्यात दाखल झालेली नाही. आळंदीत कार्तिकी एकादशी निमित्त येणाऱ्या वारकऱ्यांच्या सेवेसाठी जादा एसटी बसेस सोडण्यात आल्या होत्या. त्यातील एका एसटी चालकासोबत आणि वाहकासोबत रिक्षावाल्याचा वाद झाला.