सोयी सुविधा करताना कामगारांविषयीचा विचार केलेला असतो, असं म्हणत रावते म्हणाले की, चालक किंवा वाहक आल्यानंतर झोपायची व्यवस्था आणि अंडरवेअर बनियान धुतल्यानंतर कॉटजवळ ते वाळत घालण्यासाठी रॉड असला पाहिजे. चालक वाहकांचा जीव त्यात अडकलेला असतो. कोण कुठे घेऊन जाईल काही कळत नाही. या छोट्या गाष्टी असतात पण,त्या फार महत्वाच्या असतात असेही रावते यांनी म्हटलं आहे. पिंपरी-चिंचवड येथील वल्लभ नगर बस स्थानकातील विश्रांतीगृहाचे नूतनीकरण करण्यात आले, त्याच्या उद्घाटन प्रसंगी रावते बोलत होते.

वल्लभ नगर येथील विश्राम गृहाचे नूतनीकरणाचे कंत्राट एका संस्थेने घेतले होते. मात्र त्या कामावर रावतेंनी नाराजी व्यक्त करत या कामात त्रुटी दाखवून दिल्या. ते म्हणाले की, पत्र्याच्या बेडच्या जवळ मोबाईल चार्जर पॉईंट असला पाहिजे. मोबाईलशिवाय सुचत नाही, माणसाला शांत करायचे असेल तर नको त्या बाता मारत नाहीत, त्यात मोबाईलवर रोमँटिक रमणारा असेल तर…असं म्हणून पुढचा विषय रावते यांनी बोलणं टाळलं.

मी रात्रंदिवस ग्रामीण भागात फिरणारा माणूस आहे. पूर्वी बसने प्रवास करायचो,आता गाडीने जातो.पक्षाचं काम देखील बसमध्ये फिरून करत होतो.गेली ३०-३२ वर्षे झाली ग्रामीण भागात काम करतो आहे. मी मुंबई चा महापौर होतो हेदेखील लोक विसरली एवढं काम मी ग्रामीण भागात केलं आहे. असंही रावेत यांनी म्हटलं आहे. सगळ्या सुविधा निर्माण करत असताना मी माझ्या संकल्पना मांडल्या आहेत असंही रावतेंनी म्हटलं आहे. परिवहन मंत्री दिवाकर रावते म्हणाले.