News Flash

पिंपरी चिंचवडमध्ये कॅब चालकाची पोलिसाला धक्काबुक्की

पुण्यानंतर पिंपरी चिंचवडमध्ये धक्काबुक्कीचा प्रकार

Mumbai : यापूर्वी चेंबूरमध्ये जुलै महिन्यात कांचन नाथ या मॉर्निंग वॉकला गेल्या असताना त्यांच्या अंगावर नारळाचे झाड पडले होते. त्यांचाही उपचारादरम्यान मृत्यू झाला होता. यावेळी पालिकेने जोरदार वाऱ्यांमुळे झाड पडल्याचे सांगत आपली जबाबदारी झटकली होती.

पुण्यात वाहतूक पोलिसाला मारहाण केल्याची घटना ताजी असतानाच पिंपरी चिंचवडमधील हिंजवडीत आणखी एका वाहतूक पोलिसाला धक्काबुक्की झाल्याचा प्रकार समोर आला आहे. शिवाजी चौकात नो एन्ट्रीतून निघालेल्या कॅब चालकाने मल्हारी वाघमारे या वाहतूक पोलिसाच्या पायावर गाडी घातली. वाघमारे यांनी गाडीवर थाप मारल्याने कॅब चालक विद्याधर अवताडेने वाघमारे यांना धक्काबुक्की करत शिवीगाळ केली.

हिंजवडी पोलीस स्टेशनमध्ये याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. मात्र अद्याप कॅब चालकाला अद्याप अटक करण्यात आलेली नाही. आज सकाळी साडे दहाच्या सुमारास ही घटना घडली. पुण्यापाठोपाठ पिंपरी चिंचवडमध्ये घडलेल्या या घटनेने वाहतूक पोलिसांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 17, 2017 11:01 pm

Web Title: cab driver beats traffic police in pimpri chinchwad
Next Stories
1 पुण्यात निर्दयी आईने पोटच्या मुलीला नदीत फेकले
2 पुण्यातील लॉजमध्ये तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या
3 पिंपरी-चिंचवडमधील एका महिलेचा स्वतःची वेणी कापल्याचा दावा
Just Now!
X