News Flash

रिक्षा भाडेवाढीसाठी मीटरच्या कॅलिब्रेशनला ३० नोव्हेंबरची मुदत

रिक्षाला देण्यात आलेल्या भाडेवाढीसाठी सध्याच्या इलेक्ट्रॉनिक मीटरमधील यंत्रणेत बदल (कॅलिब्रेशन) करण्यासाठी ३० नोव्हेंबपर्यंतची अंतिम मुदत देण्यात आली आहे.

| October 28, 2013 02:41 am

 रिक्षाला देण्यात आलेल्या भाडेवाढीसाठी सध्याच्या इलेक्ट्रॉनिक मीटरमधील यंत्रणेत बदल (कॅलिब्रेशन) करण्यासाठी ३० नोव्हेंबपर्यंतची अंतिम मुदत देण्यात आली आहे. या मुदतीनंतर प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून रिक्षाचालकांवर कारवाई केली जाणार आहे.
जिल्हा परिवहन प्राधिकरणाने रिक्षाला १५ ऑक्टोबरपासून भाडेवाढ दिली आहे. ही भाडेवाढ देताना पहिल्यांदात पुण्यामध्ये रिक्षाच्या भाडय़ाचा पहिला टप्पा एक किलोमीटरवरून दीड किलोमीटर करण्यात आला आहे. त्यामुळे सध्याच्या इलेक्ट्रॉनिक मीटरमधील एक किलोमीटरच्या टप्प्यातही बदल करावा लागणार आहे. त्यासाठी मीटरच्या यंत्रणेत काही बदल करावे लागणार आहेत. रिक्षा चालकांना हे मीटर काढून संबंधित संस्थांना द्यावे लागणार आहेत. ही प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी ३० नोव्हेंबपर्यंतचीच मुदत देण्यात आली आहे.
मीटरचे कॅलिब्रेशन पूर्ण करून दीड किलोमीटरचा टप्पा असलेला मीटर रिक्षाला लावेपर्यंत सध्याच्या मीटरमध्ये दर्शविलेल्या किलोमीटरवरून नव्या भाडेपत्रकानुसार भाडे आकारण्यास रिक्षाचालकांना परवानगी देण्यात आली आहे. मात्र, ३० नोव्हेंबरनंतरही कॅलिब्रेशन न झालेल्या रिक्षा चालकांवर कारवाई करण्यात येणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 28, 2013 2:41 am

Web Title: calibration period for rikshaw meters is upto 30 nov
Next Stories
1 महिलेची साखळी चोरणाऱ्या दोघांना अटक
2 समाजाच्या आरोग्यासाठी सेवाभाव ही देखील राष्ट्रभक्ती – श्रीनिवास पाटील
3 ज्येष्ठ पत्रकार माधवराव खंडकर यांचे निधन
Just Now!
X