कर्करुग्णांनी आपल्या आजाराशी दिलेला लढा आणि त्यावर यशस्वीपणे केलेली मात या प्रवासाचे व्हिडीओ चित्रण करुन ही मंडळी इतरांना प्रेरणा देऊ शकणार आहेत. या बाबतीतला स्वत:चाच ६० सेकंदांचा व्हिडीओ तयार करण्याची स्पर्धा कर्करोगातून बऱ्या झालेल्या रुग्णांसाठी खुली झाली आहे.
जून महिन्यातील पहिला रविवार कर्करोगावर मात केलेल्या रुग्णांचा गौरव करण्यासाठी ‘सव्‍‌र्हायव्हर्स डे’ म्हणून साजरा केला जातो. या निमित्ताने कर्करोग मदत गट ‘पिंक होप’ आणि ‘एचजीसी एंटरप्रायजेस’ यांच्यातर्फे हा उपक्रम राबवला जात आहे.
या स्पर्धेत भाग घेण्यासाठी कर्करोगातून बचावलेल्या रुग्णांनी त्यांचा लढा आणि आजारावर केलेली मात यांचा ६० सेकंदांचा व्हिडीओ तयार करुन तो facebook.com/hcghospitalsकिंवा http://www.selfv.in या संकेतस्थळावर अपलोड करायचा आहे. ही स्पर्धा ७ जूनला सुरू झाली असून ती पुढे ४५ दिवस खुली राहील. चित्रपट क्षेत्रातील व्यक्ती अपलोड झालेल्या व्हिडीओंचे परीक्षण करणार असून उत्कृष्ट व्हिडीओंना पारितोषिकेही देण्यात येणार आहेत.