News Flash

पुण्यातील कामशेतमध्ये तळघरात सापडला तब्बल ८६ लाखांचा गांजा

मुख्य आरोपी फरार, साथीदाराला केले अटक

मावळ परिसरातून सराईत गुन्हेगारांच्या घरातून तब्बल ८६ लाख रुपयांचा गांजा कामशेत पोलिसांनी जप्त केला आहे. या प्रकरणी एका आरोपीस जेरबंद करण्यात कामशेत पोलिसांना यश आले असून दुसरा आरोपी पळून गेला आहे. अशी माहिती कामशेत पोलिसांनी दिली आहे. त्यांच्यावर एनडीपीएस कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

संतोष रामचंद्र वाळुंज असे पळून गेलेल्या गुन्हेगाराचे नाव असून धनाजी विठ्ठल जीटे याला पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून तब्बल ५७८  किलो गांजा जप्त करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सराईत मुख्य आरोपी संतोष यांच्या घराच्या खाली (तळघर) गांजा लपवण्यासाठी जागा केली होती. तिथे तब्बल ५७८ किलो गांजा लपविण्यात आला होता. याची माहिती लोणावळा सहाय्यक पोलीस अधीक्षक आणि उपविभागीय पोलीस अधिकारी यांना  मिळाली होती. पोलीस अधीक्षक संदीप पाटील, यांच्या मार्गदर्शनाखाली कामशेत येथील पोलीस ठाण्यातील अधिकारी विठ्ठल बदडे, स्थानिक गुन्हे शाखा अधिकारी पद्माकर घनवट, पृथ्वीराज ताटे तसेच श्वान पथकाने पवना नगर येथे राहात असलेल्या संतोषच्या घरावर छापा टाकला, त्यात ५७८ किलो गांजा जप्त करण्यात आला आहे. परंतु, मुख्य आरोपी संतोष हा पळून गेला असून दुसरा साथीदार धनाजी याला अटक करण्यात आली आहे. घटनेचा अधिक तपास कामशेत पोलीस करत आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 21, 2020 9:09 pm

Web Title: cannabis worth rs 86 lakh found in basement in kamshet pune msr 87 kjp 91
Next Stories
1 जय गणेश व्यासपीठांतर्गत मध्य पुण्यातील २७२ गणेशोत्सव मंडळांतर्फे आरोग्योत्सवास प्रारंभ
2 श्रावणातील मंगळागौरीवरच टाळेबंदी
3 टाळेबंदीत रेल्वेकडून पायाभूत कामे
Just Now!
X