28 September 2020

News Flash

पुण्यातील भाजपा नगरसेवकाची फॉर्च्युनर गाडीची चोरी

घराच्या पार्कींगमध्ये फॉर्च्युनर गाडी लावली होती

पुणे महानगरपालिकेचे भाजपाचे नगरसेवक दीपक पोटे यांची फॉर्च्युनर गाडी चोरली गेल्याची घटना घडली असून या प्रकरणी दत्तवाडी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  पोलिसानी दिलेल्या माहितीनुसार, पुणे महापालिकेतील भाजपचे नगरसेवक दीपक पोटे हे सिंहगड रोडवरील एका सोसायटीत राहत असून काल रात्री नेहमीप्रमाणे घराच्या पार्कींगमध्ये फॉर्च्युनर गाडी लावली होती. तर आज सकाळी उठल्यानंतर पाहिले असता गाडी जाग्यावर नाही. त्यानंतर त्यांनीआजूबाजूच्या परिसरात पाहणी केली. मात्र गाडीचा शोध लागला नाही. त्यानंतर त्यांनी गाडी चोरीला गेल्याची तक्रार दिली असून या घटनेचा तपास करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 24, 2019 7:06 pm

Web Title: car stolen of bjp corporator in pune
Next Stories
1 अंडरवेअर बनियान मध्ये चालक वाहकांचा जीव अडकलेला असतो-परिवहन मंत्री
2 सुनेने दारू आणून दिली नाही, सासरच्यांनी केला हत्येचा प्रयत्न
3 पुणे: युट्यूब पाहून छापल्या बनावट नोटा, युवकाला अटक
Just Now!
X