राज्यात निसर्गरम्य समुद्र किनारे, ऐतिहासिक किल्ले, पर्वतरांगा, थंड हवेची ठिकाणे, नदी, वनसंपदा, ऐतिहासिक वारसास्थळे, लेणी, धरणे अशी अनेक पर्यटनाची ठिकाणे आहेत. यातील अनेक ठिकाणी हॉटेल वा निवासस्थानांच्या सोयी कमी प्रमाणात उपलब्ध आहेत. तसेच अनेक ठिकाणी बांधकामासाठी कायमस्वरूपी प्रतिबंध घालण्यात आले आहेत. अशा ठिकाणी कॅराव्हॅन व कॅम्परव्हॅनच्या साहाय्याने पर्यटकांना निवासाच्या सर्व सोयीसुविधा उपलब्ध करून देण्याचे धोरण राज्य शासनाने तयार केले आहे.

राज्याला वैविध्यपूर्ण सौंदर्य लाभले आहे. या ठिकाणी कॅराव्हॅन पर्यटनासाठी मोठा वाव आहे. अतिदुर्गम भागात हॉटेल, निवासस्थानांसारख्या राहण्याच्या सोयी कमी प्रमाणात उपलब्ध आहेत. अशा ठिकाणी, तसेच ज्या क्षेत्रामध्ये कायमस्वरूपी बांधकामासाठी प्रतिबंध घालण्यात आले आहेत, अशा ठिकाणी कॅराव्हॅन व कॅम्परव्हॅनच्या साहाय्याने पर्यटकांना सर्व सोयीसुविधा उपलब्ध करून देता येतील, अशा स्वरूपाचे हे धोरण आहे. या बरोबरच जेथे सध्या पक्के  बांधकाम असलेल्या निवासव्यवस्था उपलब्ध नाहीत, अशा ठिकाणी कॅराव्हॅन पर्यटन करता येईल. या अनुषंगाने कॅराव्हॅन पर्यटन धोरण तयार करण्यात आले आहे. कॅराव्हॅन पर्यटन धोरणाबाबत नागरिकांकडून हरकती, सूचना मागवण्यात आल्या आहेत. कॅराव्हॅन धोरणाचा मसुदा पर्यटन संचालनालयाच्या http://www.maharashtratourism.gov.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आला आहे. या कॅराव्हॅन धोरणाबाबत सूचना व हरकती   diot@maharashtratourism.gov.in   आणि  asdtourism.est-mh@gov.in या ई-मेलवर ३ ऑक्टोबपर्यंत पाठवण्याचे आवाहन पर्यटन संचालनालयाकडून करण्यात आले आहे, अशी माहिती पर्यटन संचालनालयाच्या उपसंचालक सुप्रिया करमरकर-दातार यांनी दिली.

thane, traffic route changes marathi news, namo central park marathi news
नमो सेंट्रल पार्क परिसरात मोठे वाहतूक बदल; शनिवार, रविवार या दिवशीच लागू असणार बदल, वाहतूक कोंडी टाळण्यासाठी उपाययोजना
pimpri police commissioner office marathi news, pimpri police commissioner office latest news in marathi
पिंपरी : अखेर पाच वर्षांनी पोलीस आयुक्तालयाला मिळाली हक्काची जागा, ‘या’ ठिकाणी होणार आयुक्तालय
Ajni Chowk
नागपूर : पाच रस्ते, मेट्रोस्थानकामुळे अजनी चौक ‘अपघातप्रवण’! नीरीच्या नियोजित जागेवर मेट्रो स्थानक न बांधल्याचा फटका
Devotees demand through a march in Kolhapur
बाळूमामा देवस्थानातील गैरव्यवहाराची सीआयडीकरवी करा; कोल्हापुरात मोर्चाद्वारे भक्तांची मागणी

‘कॅराव्हॅन’ म्हणजे काय?

घरात किं वा एखाद्या हॉटेलमध्ये ज्या सुविधा असतात, त्या सुविधांप्रमाणे सर्व सुविधा कॅराव्हॅनमध्ये देण्यात येतात. सर्व सोयी-सुविधांनी युक्त अशी ही व्हॅन असते. पाश्चात्य देशांमध्ये शहरात बंगले असणाऱ्यांनी किंवा डोंगराळ, दुर्गम भागातील रहिवाशांनी आपल्या जागेत कॅराव्हॅन उपलब्ध करून दिली आहे. या व्हॅनमध्ये टेबल, खुर्ची, छोटे स्वयंपाकघर, दूरचित्रवाणी संच, वीज, शीतकपाट, स्वच्छतागृह, बेड अशा आवश्यक सर्व सुविधा उपलब्ध असतात.

राज्यातील धरणांच्या पाणलोट क्षेत्राच्या ठिकाणी प्रेक्षणीय कॅम्पिंग साइट्स आहेत. अशा काही आकर्षित करणाऱ्या ठिकाणी कॅराव्हॅनच्या माध्यमातून पर्यटकांची निवासव्यवस्था होऊ शकते. परदेशात अनेक ठिकाणी अशा पर्यटनाला मोठी मागणी आहे. त्यानुसार राज्यातही अंमलबजावणी करण्यात येणार आहे.

– सुप्रिया करमरकर-दातार, उपसंचालक, पर्यटन संचालनालय