News Flash

निगडीमध्ये अलिशान गाड्यांची अज्ञातांकडून तोडफोड, रहिवासी भयभीत

निगडी प्राधिकरणातील २० ते २२ गाड्यांचे नुकसान

पोस्ट ऑफिस परिसरात लावण्यात आलेल्या २० ते २२ गाड्यांवर अज्ञातांकडून मंगळवारी रात्री दगडफेक करण्यात आली.

निगडी प्राधिकरणातील पोस्ट ऑफिस परिसरात लावण्यात आलेल्या २० ते २२ गाड्यांची अज्ञातांनी मंगळवारी रात्री उशीरा तोडफोड केली. गेल्या काही महिन्यांपासून पिंपरी-चिंचवड परिसरात गाड्यांची तोडफोड करण्याचे सत्रच सुरू असून, सतत घडणाऱ्या या प्रकारामुळे परिसरातील नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पोस्ट ऑफिस परिसरात लावण्यात आलेल्या २० ते २२ गाड्यांवर अज्ञातांकडून मंगळवारी रात्री दगडफेक करण्यात आली. यापैकी निम्म्याहून अधिक गाड्या अलिशान आहेत. या गाड्यांच्या काचा फोडण्यात आल्या आहेत. हा प्रकार पूर्ववैमनस्यातून घडला आहे का, याचा तपास पोलीस करीत आहेत. हा संपूर्ण परिसर उच्चभ्रूंची वस्ती म्हणून ओळखला जातो. गाड्या फोडण्याच्या प्रकारामुळे तेथील रहिवासी भयभीत झाले आहेत. या प्रकरणी पोलीसांकडे तक्रार दाखल करण्यात आला असून, अज्ञातांचा शोध घेण्यात येतो आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 1, 2016 12:36 pm

Web Title: cars parked in nigdi broken by unknown persons
टॅग : Pimpri Chinchwad
Next Stories
1 BLOG : उद्योजकीय समर कॅम्प
2 गावंडेंचा बोलविता धनी कोण?
3 कदम कदम बढाये जा..
Just Now!
X