पुण्यात पुन्हा एकदा वाहनांच्या तोडफोडीचा प्रकार घडला आहे. पुण्यात कर्वेनगरमधील हिंगणे होम कॉलनीत सोमवारी मध्यरात्री तब्बल १६ वाहनांची तोडफोड करण्यात आली. रात्री अडीजच्या सुमारास दुचाकीवरुन आलेल्या दोघांनी टिकाव आणि कुदळीने घाव घालून रस्त्याच्या कडेला पार्क केलेल्या गाडया फोडल्या.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हल्लेखोरांनी प्रामुख्याने चार चाकी वाहनांना लक्ष्य केले. या तोडफोडीत १२ चारचाकी आणि चार दुचाकी वाहनांचे नुकसान झाले आहे. अचानक गाडयांच्या काचा फुटण्याचे आवाज येऊ लागल्याने काही जणांना जाग आली. पण भितीपोटी कोणी घराबाहेर पडले नाही.

परिसरातील स्थानिक तरुणांनीच या गाडया फोडल्याची शक्यता आहे. पोलीस या घटनेचा तपास करत आहेत. तोडफोडीमागचे नेमके कारण स्पष्ट होऊ शकलेले नाही. यापूर्वी सुद्धा पुण्यात रात्रीच्यावेळी गाडया फोडण्याच्या आणि जाळण्याच्या घटना घडल्या आहेत.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Cars vandalised by miscreant
First published on: 22-10-2018 at 10:16 IST