23 September 2020

News Flash

आर. के. लक्ष्मण यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार, राज्य सरकार स्मारक उभारणार

'कॉमन मॅन'चे जनक आणि ज्येष्ठ व्यंगचित्रकार आर. के. लक्ष्मण यांच्या पार्थिवावर मंगळवारी दुपारी पुण्यातील वैकुंठ स्मशानभूमीत शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.

| January 26, 2015 08:18 am

‘कॉमन मॅन’चे जनक आणि ज्येष्ठ व्यंगचित्रकार आर. के. लक्ष्मण यांच्या पार्थिवावर मंगळवारी दुपारी पुण्यातील वैकुंठ स्मशानभूमीत शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. पोलीस दलाकडून त्यांना मानवंदना देण्यात आली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यासह राजकीय, सामाजिक क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी वैकुंठ स्मशानभूमीत लक्ष्मण यांच्या पार्थिवाचे दर्शन घेऊन त्यांना श्रद्धांजली वाहिली. लक्ष्मण यांच्या कार्याचा गौरव करण्यासाठी राज्य सरकार त्यांचे स्मारक उभारेल, अशी घोषणा यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी केली.

फोटो गॅलरी : आर.के.लक्ष्मण यांना मुंबईकरांची श्रध्दांजली

आर. के. लक्ष्मण यांचे सोमवारी संध्याकाळी पुण्यात निधन झाले. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात उपचार सुरू होते. सोमवारी संध्याकाळी सहा वाजून ५० मिनिटांनी रुग्णालयातच त्यांची प्राणज्योत मालवली.
‘द टाइम्स ऑफ इंडिया’ वृत्तपत्रातून त्यांनी काढलेली व्यंगचित्रे खूप गाजली होती. ‘कॉमन मॅन’ या व्यक्तिरेखेच्या माध्यमातून त्यांनी भोवतालच्या राजकीय, सामाजिक, आर्थिक घडामोडींवर मार्मिक भाष्य केले होते. त्यांनी लिहिलेली प्रवासवर्णने तसेच ‘मालगुडी डेज’ या कादंबरीसाठी रेखाटलेली अर्कचित्रे लोकप्रिय झाली होती. भारतीय व्यंगचित्रकलेला त्यांनी नवी ओळख मिळवून दिली. व्यंगचित्रासोबतच्या ओळींमधून त्यांनी काढलेले चिमटे न बोचता नेमका परिणाम साधत. त्यांच्या योगदानाबद्दल भारत सरकारने १९७१ साली पद्मभूषण आणि २००५ साली पद्मविभूषण पुरस्काराने त्यांना सन्मानित केले. १९८४ साली मॅगसेसे पुरस्काराने आर. के. लक्ष्मण यांचा गौरव करण्यात आला होता.
२४ ऑक्टोबर १९२१ रोजी म्हैसूरमध्ये जन्माला आलेल्या आर. के. लक्ष्मण यांना मुंबईतील प्रसिद्ध जे जे स्कुल ऑफ आर्ट्समध्ये प्रवेश नाकारण्यात आला होता. त्यामुळे त्यांनी म्हैसूरच्या विद्यापीठातून बी. ए.ची पदवी घेतली आणि मुंबईच्या ‘फ्री प्रेस जर्नल’मध्ये पहिली पूर्णवेळ नोकरी केली. विशेष म्हणजे तिथे दिवंगत व्यंगचित्रकार आणि शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हे त्यांचे सहकारी होते. त्यानंतर जवळपास ५० वर्षे त्यांनी ‘टाईम्स ऑफ इंडिया’मध्ये व्यंगचित्र रेखाटली.

rk-laxmanस्वामी चिन्मयानंद यांच्याकडून ‘बी. डी. गोएंका पत्रकारिता’ पुरस्कार स्वीकारताना आर. के. लक्ष्मण. यावेळी रामनाथ गोएंकाही उपस्थित होते. (एक्स्प्रेस छायाचित्र संग्रहातून)

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 26, 2015 8:18 am

Web Title: cartoonist r k laxman passes away in pune
टॅग R K Laxman
Next Stories
1 ‘जातींच्या आधारे समाजामध्ये फूट पाडण्याचे कारस्थान’
2 ‘फेसबुक’द्वारे जाळ्यात ओढून व्यापाऱ्याच्या भावाचे अपहरण
3 पुणे विभागाची अंतिम फेरी बुधवारी रंगणार
Just Now!
X