अहिल्यादेवींच्या पुतळ्याच्या अनावरणाचा प्रयत्न

जेजुरी : जेजुरी येथील खंडोबा गडावर शुक्रवारी पहाटे अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्याचे अनावरण करण्याचा प्रयत्न आमदार गोपीचंद पडळकर यांनी कार्यकर्त्यांसह के ला. ढोल-ताशे वाजवत, फटाके  फोडून पुतळ्याचे अनावरण झाल्याची घोषणा पडळकर यांनी के ली. याप्रकरणी पडळकर यांच्यावर जेजुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान, पुतळ्याचे अनावर ठरल्यानुसार शनिवारी (१३ फे ब्रुवारी) होणार असल्याचे विश्वस्तांनी स्पष्ट के ले.

अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्याचे अनावरण शनिवारी ठरले आहे. मात्र, आमदार पडळकर आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी शुक्रवारी पहाटेच्या सुमारास पुतळ्याचे अनावरण करण्याचा प्रयत्न के ला. पडळकर यांनी पुतळ्यासमोर जाहीर सभाही घेतली.

दरम्यान, अहिल्यादेवी यांच्या पुतळ्याचे अनावरण झाले नसून शनिवारी (१३ फे ब्रुवारी) रोजी नियोजित कार्यक्रमानुसार पुतळ्याचे अनावरण होणार असल्याची माहिती गडाचे मुख्य विश्वस्त अ‍ॅड. प्रसाद शिंदे आणि बारामती विभागाचे अप्पर पोलीस अधीक्षक मिलिंद मोहिते यांनी दिली. पुतळ्याचे अनावर खासदार शरद पवार, छत्रपती संभाजी राजे, युवराज यशवंत होळकर यांच्या उपस्थितीत शनिवारी होणार आहे. जमावबंदी उल्लंघन, शासकीय कामात अडथळा के ल्याप्रकरणी पडळकर, माउली हळवणकर, जयंत सलगर यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यावर टीका के ल्याने राष्ट्रवादी काँग्रेसकडून पडळकर यांचा निषेध करण्यात आला.

अनामत रक्कम जप्त झालेल्यांची काय नोंद घ्यायची?

आमदार पडळकर यांनी अहिल्यादेवींच्या पुतळ्याच्या अनावरणाचा के लेला प्रयत्न आणि जाहीर सभेत ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यावर के लेल्या टीके बाबत उपमुख्यमंत्री पवार म्हणाले, ‘पडळकर यांना विनाशकाले विपरीत बुद्धी सुचली आहे. जनतेचा त्यांना पाठिंबा आहे का? प्रमुख पक्षाने तिकीट दिल्यानंतरही या पठ्ठय़ाची निवडणुकीत अनामत रक्कम जप्त झाली. अशा लोकांची काय नोंद घ्यायची?’