News Flash

खूनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी रावसाहेब दानवेंचे जावई अडचणीत; पुणे पोलिसांनी दाखल केला गुन्हा

जीवे ठार मारण्याचा प्रयत्न

भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांचे जावई माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांच्यावर पुण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चतुःशृंगी पोलिस ठाण्यात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हत्येचा प्रयत्न केल्याच्या आऱोपाखाली हर्षवर्धन जाधव आणि अजून एका व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. हर्षवर्धन जाधव आणि इशा झा या दोघा विरोधात अमन चड्डा यांनी फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार अमन चड्डा सोमवारी सकाळच्या सुमारास आई, वडिलांना दुचाकीवरून ब्रेमन चौकाकडे घेऊन जात होते. याचवेळी हर्षवर्धन जाधव आणि ईशा झा हे रस्त्याच्या बाजूला एका चारचाकीमध्ये बसले होते. कारचा दरवाजा उघडल्याने चड्डा यांच्या दुचाकीचा अपघात झाला. यानंतर चड्डा यांनी चार चाकीमध्ये बसलेल्या हर्षवर्धन जाधव आणि ईशा यांना जाब विचारला.

त्यावर हर्षवर्धन जाधव आणि ईशा झा यांनी अमन चड्डा आण् त्यांच्या वडिलांना मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यावेळी चड्डा यांनी वडिलांच्या हृदयाचे ऑपरेशन झाल्याचं सांगितलं. मात्र तरीही दोघांनी मारहाण करणं चालूच ठेवलं. यानंतर अमन चड्डा यांनी जीवे ठार मारण्याचा प्रयत्न झाल्याची तक्रार दिली आहे. त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आल्याचे चतुःशृंगी पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 15, 2020 4:20 pm

Web Title: case registered against harshwardhan jadhav in pune svk 88 sgy 87
Next Stories
1 दिल्लीच्या आंदोलनाची केंद्रानं दखल घ्यावी, अन्यथा महाराष्ट्रातून…; अजित नवलेंचा इशारा
2 अमानुष कृत्य : सात महिन्याच्या श्वानाला चौथ्या मजल्यावरून फेकले; घटनेत श्वानाचा मृत्यू
3 पुणे: मुलांचं उज्ज्वल भवितव्य आणि शिक्षणासाठी आई विकतेय सिग्नलवर डसबिन बॅग
Just Now!
X