16 December 2017

News Flash

पुणे: सिंहगड इन्स्टिट्यूटच्या कार्यालयांवर सीबीआयचे छापे

मारुती नवलेंच्या घराचीही झडती

प्रतिनिधी, पुणे | Updated: April 21, 2017 5:42 PM

पुण्यातील सिंहगड टेक्निकल इन्स्टिट्यूटच्या कार्यालयांवर आज, शुक्रवारी सीबीआयने छापे मारले. पुण्यातील सिंहगड रस्ता, हडपसर, पुणे-मुंबई रस्ता या ठिकाणी असलेल्या कार्यालयांवरील छापेमारीत सीबीआयच्या अधिकाऱ्यांच्या हाती काही महत्त्वाची कागदपत्रे हाती लागल्याचे सांगण्यात येत आहे.

सेंट्रल बँकेकडून घेतलेले ७५ कोटी रुपये बेकायदेशीररित्या इतर ठिकाणी वर्ग करून फसवणूक केल्याप्रकरणी सीबीआयने सिंहगड इन्स्टिट्यूटचे संस्थापक मारुती नवले यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. सीबीआयने आज सिंहगड इन्स्टिट्यूटच्या सिंहगड रस्ता, हडपसर आणि मुंबई-पुणे रस्त्यावरील कार्यालयांवर छापेमारी केली. या कार्यालयांमधून काही महत्त्वाची कागदपत्रे जप्त करण्यात आली आहेत, असे सूत्रांकडून सांगण्यात येत आहे. दरम्यान, नवले यांच्या घराचीही झाडाझडती घेण्यात येत असून, या प्रकरणात सीबीआयचे अधिकारी आणखी तपास करत आहेत.

First Published on April 21, 2017 5:42 pm

Web Title: cbi raids sinhagad institute of management offices in pune