12 August 2020

News Flash

सीबीआयकडून हवामान विभागाच्या वरिष्ठ शास्त्रज्ञ, अधिकाऱ्यावर गुन्हा

आर्थिक गैरव्यवहाराचा ठपका; खासगी कंपनीच्या संचालकांवर गुन्हा

संग्रहित छायाचित्र

आर्थिक गैरव्यवहाराचा ठपका; खासगी कंपनीच्या संचालकांवर गुन्हा

पुणे : केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाकडून (सीबीआय) आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी भारतीय हवामान शास्त्र विभागातील वरिष्ठ शास्त्रज्ञ, तांत्रिक अधिकारी तसेच मुंबईतील एका खासगी कंपनीच्या संचालकावर गुरुवारी गुन्हा दाखल करण्यात आला. वेधशाळेकडून बसविण्यात आलेले डिजिटल फलक खरेदी व्यवहारात आर्थिक गैरव्यवहार केल्याचा ठपका सीबीआयकडून ठेवण्यात आला होता. या प्रकरणाची चौकशी करण्यात आल्यानंतर गैरव्यवहार झाल्याचे निष्पन्न झाले.

या प्रकरणी भारतीय हवामान शास्त्र विभागातील वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. गुरफान बेग, तत्कालीन तांत्रिक अधिकारी विपीन माळी तसेच मुंबईतील व्हिडिओ वॉल इंडिया प्रा.लि.चे संचालक अनिल गिरकर, मनीषा अनिल गिरकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हवेची गुणवत्ता तसेच हवामानाचा अंदाज वर्तविणारे फलक पुणे शहरातील बारा ठिकाणी बसविण्याचे काम हवामान शास्त्र विभागाकडून मुंबईतील व्हिडिओ वॉल इंडिया प्रा.लि. यांना देण्यात आले होते. ‘सफर’(सिस्टीम ऑफ एअर क्वालिटी अँड वेदर फोरकास्टिंग अँड रिसर्च) या योजनेअंतर्गत डिजिटल फलक बसविण्यात आले होते. हे फलक बसविणे तसेच कंत्राट प्रकरणात आर्थिक गैरव्यवहार झाल्याची तक्रार सीबीआयच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे (सीबीआय-एसीबी) करण्यात आली होती.

त्यानंतर या प्रकरणाची चौकशी सुरू करण्यात आली होती. हे फलक बसविण्याचे काम डॉ. बेग, माळी यांनी मुंबईतील कंपनीला दिले होते. २०११ ते २०१८ या कालावधीत डॉ. बेग, माळी आणि संबंधित कंपनीच्या संचालकांनी गैरव्यवहार केल्याचे चौकशीत निष्पन्न झाल्यानंतर  सीबीआयकडून त्यांच्याविरोधात फसवणूक, अपहार या कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान, सीबीआयकडून डॉ. बेग, माळी यांच्या निवासस्थानी तसेच कार्यालयाची तपासणी करण्यात आली.

मुंबईतील व्हिडिओ वॉल इंडिया प्रा.लि.चे संचालक गिरकर यांच्या कार्यालयातून काही कागदपत्रे कारवाईत जप्त करण्यात आली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 31, 2020 1:10 am

Web Title: cbi registers corruption case against officials of indian institute of tropical meteorology zws 70
Next Stories
1 दहावीत मराठी माध्यमाला पसंती   
2 साहित्य व्यवहाराला करोनाची बाधा
3 लोकसत्ताच्या ‘एकमेव लोकमान्य’चे उद्या प्रकाशन
Just Now!
X