News Flash

सीबीएसई बारावीच्या निकालात ५.३८ टक्क्यांनी वाढ

महाराष्ट्राचा समावेश असलेल्या पुणे विभागाचा निकाल ९०.२४ टक्के

संग्रहित छायाचित्र

केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (सीबीएसई) बारावीचा निकाल सोमवारी जाहीर केला. यंदा बारावीचा निकाल ८८.७८ टक्के लागला असून, गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा निकालात ५.३८ टक्क्यांनी वाढ झाली. महाराष्ट्राचा समावेश असलेल्या पुणे विभागाचा निकाल ९०.२४ टक्के लागला आहे. यंदा सीबीएसईने गुणवत्ता यादी जाहीर केली नाही.

करोना विषाणू संसर्ग सुरू होण्यापूर्वी सीबीएसई बारावीची परीक्षा सुरू झाली होती. मात्र, वाढत्या संसर्गामुळे काही विषयांची परीक्षा रद्द करण्याचा निर्णय मंडळाने घेतला. त्यामुळे सर्व विषयांची परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांचा निकाल त्यांच्या परीक्षेतील कामगिरीनुसार, तीनपेक्षा जास्त विषयांची आणि तीनच विषयांची परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांच्या उर्वरित विषयांची सरासरी काढून मूल्यमापन करण्यात आले. तर एक किंवा दोनच विषयांची परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांचे मूल्यमापन संबंधित परीक्षेतील कामगिरी आणि अंतर्गत मूल्यमापनानुसार करण्यात आल्याची माहिती सीबीएसईकडून देण्यात आली.

यंदा १३ हजार १०९ शाळांतील विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. परीक्षेसाठी नोंदणी के लेल्या देशभरातील १२ लाख ३ हजार ५९५ विद्यार्थ्यांपैकी ११ लाख ९२ हजार ९६१ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. त्यातील १० लाख ५९ हजार ८० विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. निकालात मंडळाच्या त्रिवेंद्रम (९७.६७ टक्के ) आणि बेंगळुरू (९७.०५ टक्के ) विभागांनी आघाडी घेतली, तर पाटणा विभागाचा (७४.५७ टक्के ) निकाल सर्वात कमी आहे. मुलांच्या तुलनेत मुलींचे उत्तीर्ण होण्याचे प्रमाण ५.९६ टक्क्यांनी जास्त आहे. देशभरातील ३८ हजार ६८६ विद्यार्थ्यांनी ९५ टक्क्यांपेक्षा जास्त, तर १ लाख ५७ हजार ९३४ विद्यार्थ्यांनी ९० टक्क्यांपेक्षा जास्त गुण मिळवले. गेल्या वर्षीच्या तुलनेत ९५ आणि ९० टक्क्यांपेक्षा जास्त गुण मिळवलेल्या विद्यार्थ्यांची संख्या जवळपास निम्म्याने कमी झाल्याचे स्पष्ट झाले आहे.

गेल्यावर्षीपर्यंत महाराष्ट्राचा समावेश चेन्नई विभागाअंतर्गत होता. मात्र, मंडळाने दहा विभागांचे विके ंद्रीकरण करून सहा विभाग नव्याने निर्माण करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार महाराष्ट्र, गोव्याचा समावेश असलेला पुणे विभाग निर्माण झाला. राष्ट्रीय पातळीवरील निकालात पुणे विभाग (९०.२४ टक्के) दहाव्या स्थानी आहे.

फेरपरीक्षेची संधी

सीबीएसईकडून विद्यार्थ्यांना फेरपपरीक्षेची संधी दिली जाणार आहे. केंद्र शासनाचा सल्ला घेऊन फेरपरीक्षेचे आयोजन करण्यात येईल. फेरपरीक्षेचे वेळापत्रक स्वतंत्रपणे जाहीर करण्यात येईल, असे सीबीएसईने स्पष्ट केले आहे.

अनुत्तीर्ण शेरा नाही

सीबीएसईने विद्यार्थ्यांच्या गुणपत्रिकेवर अनुत्तीर्ण शेरा न देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांच्या गुणपत्रिके वर ‘इसेन्शियल रीपीट’ (फेरपरीक्षेसाठी पात्र) असा शेरा नमूद करण्यात आल्याचे स्पष्ट नमूद करण्यात आले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 14, 2020 12:10 am

Web Title: cbse xii results up 5 38 per cent abn 97
Next Stories
1 पुण्यात सोन्याचा ‘नेकलेस कम मास्क’ बाजारात; साडेसहा लाखांच्या महागड्या मास्कची चर्चा
2 पिंपरी-चिंचवड पोलिसांकडून लॉकडाउनची तयारी पूर्ण; नागरिकांना बाहेर न पडण्याचं आवाहन
3 भारतासोबत नेपाळने मैत्रीचे संबंध ठेवावे, पुण्यातील नेपाळी नागरिकांची मागणी
Just Now!
X