05 March 2021

News Flash

व्हॅलेंटाईन दिनी रस्ते तरुणाईने फुलले!

‘राईट टू लव्ह’ फेरी बराेबरच याच रस्त्यावर स्त्रियांवरील अत्याचार व हिंसेचा निषेध करण्यासाठी ‘वन बिलिअन रायझिंग’ फेरीही काढण्यात आली.

‘व्हॅलेंटाईन डे’ आणि आठवडा सुटी असा दुहेरी योग जुळून आल्याचा आनंद लुटत तरुणाईने रविवारी शहरातील प्रमुख रस्त्यांवर गर्दी करुन प्रेमाचा उत्सव साजरा केला.
फग्र्युसन रस्ता, जंगली महाराज रस्ता, झेड ब्रिज, डेक्कन परिसरात रविवारी दुपारपासूनच तरुणांची गर्दी होऊ लागली. अनेकांनी आवर्जून लाल रंगाचा  समावेश पोशाखात केलेला दिसत होता. या दोन्ही रस्त्यांवरील तसेच कँप आणि कोरेगाव भागातील रेस्टॉरंटस् गर्दीने ओसंडून वाहात होती. सारसबाग आणि संभाजी बागेसह विविध उद्यानांना, तसेच महाविद्यालयांच्या आसपास असलेल्या तरुणांच्या कट्टय़ांनाही जोडप्यांची पसंती दिसली. लाल रंगाची गुलाबाची फुले, बदामाच्या आकाराचे लाल फुगे, फरचे टेडीबिअर, टेडीबिअरच्या की-चेन्स, व्हॅलेंटाईन दिनाची भेटकार्डे या भेटवस्तूंचा बाजार तेजीत होता. अनेक मोठय़ा हॉटेल्सनी व्हॅलेंटाईन दिनानिमित्त वाद्यसंगीत व खास मेन्यूसह पाटर्य़ाचे आयोजन केले होते, तसेच ग्राहकांसाठी काही सवलतीही जाहीर केल्या होत्या.
तरुणांच्या काही गटांनी विविध संस्थांना भेटी देऊन व्हॅलेंटाईन दिन साजरा केला, तर काहींनी या निमित्ताने सामाजिक प्रश्नांकडे लक्ष वेधण्यासाठी मोर्चासारख्या कार्यक्रमांचे आयोजन केले. फग्र्युसन रस्त्यावर तरुणांनी प्रेम व्यक्त करण्याच्या अधिकाराचा पुरस्कार करत ‘राईट टू लव्ह’ फेरी काढली. तर याच रस्त्यावर स्त्रियांवरील अत्याचार व हिंसेचा निषेध करण्यासाठी ‘वन बिलिअन रायझिंग’ फेरीही काढण्यात आली. आंबेगाव येथील अभिनव एज्युकेशन सोसायटीची इंग्रजी माध्यमाची शाळा व कनिष्ठ महाविद्यालयातील एनएसएस विभागातर्फे व्हॅलेंटाईन दिनानिमित्त सेवाधाम वृद्धाश्रमातील आजी-आजोबांचे पाद्यपूजन व औक्षण केले गेले आणि त्यांना गुलाबाचे फूल देण्यात आले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 15, 2016 3:14 am

Web Title: celebration of valentine day
टॅग : Valentine Day
Next Stories
1 – गजानन सरपोतदार पथाचे महापौरांच्या हस्ते नामकरण
2 मिल्ट्री डेअरी फार्ममधील घोटाळाप्रकरणी सीबीआयचे पुण्यात छापे
3 बाराशे सेवकांकडून पुणे रेल्वे स्थानक चकाचक
Just Now!
X