भारतातील जर्मन भाषेच्या शिक्षणाच्या शतकोत्सवानिमित्त पुणे विद्यापीठाच्या परकीय भाषा विभागातर्फे विद्यार्थ्यांसाठी विविध स्पर्धाचे आयोजन करण्यात आले असून या स्पर्धाचे नुकतेच उद्घाटन झाले.
जर्मन भाषाशिक्षणाच्या शतकोत्सवानिमित्त परकीय भाषा विभागातर्फे वर्षभर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. या कार्यक्रमांची सुरुवात विद्यार्थ्यांसाठी विविध स्पर्धाचे आयोजन करून करण्यात आली आहे. परकीय भाषा विभाग, मॉडर्न महाविद्यालय, फर्ग्र्युसन महाविद्यालय, सिम्बॉयसिस महाविद्यालय आणि एमएमसीसी या महाविद्यालयांमधील जर्मन भाषा विभागातर्फे या स्पर्धाचे आयोजन करण्यात आले आहे. मॉडर्न महाविद्यालयामध्ये या स्पर्धाचा उद्घाटन समारंभ शुक्रवारी झाला. या वेळी डॉ. प्रमोद तलगेरी मॉडर्न महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. राजेंद्र झुंजारराव, जर्मन वकिलातीचे प्रतिनिधी इव्हलेन रेगनफुस, डॅनिएला डिएरकेर, आनिया हॅलाकेअर, परकीय भाषा विभागाच्या प्रमुख मंजिरी परांजपे आदी उपस्थित होते. शालेय स्तरापासून पदव्युत्तर स्तरापर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी स्पर्धाचे आयोजन करण्यात आले असून १४ डिसेंबरपर्यत या स्पर्धा होणार आहेत.