News Flash

बेकायदेशीर लोहमार्ग ओलांडणाऱ्या वाहनांची माहिती देण्याचे आवाहन

बेकायदेशीरपणे लोहमार्ग ओलांडणाऱ्या वाहनांची माहिती कळविण्याचे आवाहन मध्य रेल्वेने केले आहे. ही माहिती देण्यासाठी ९५०३०१३७०५ हा मोबाईल क्रमांकही जाहीर करण्यात आला आहे.

| November 22, 2013 02:40 am

आकुर्डीच्या दळवीनगर भागामध्ये लोहमार्गात मोटार अडकून पडल्याच्या पाश्र्वभूमीवर अशा प्रकारे बेकायदेशीरपणे लोहमार्ग ओलांडणाऱ्या वाहनांची माहिती कळविण्याचे आवाहन मध्य रेल्वेने केले आहे. ही माहिती देण्यासाठी ९५०३०१३७०५ हा मोबाईल क्रमांकही जाहीर करण्यात आला आहे.
चिंचवड व आकुर्डी स्थानकादरम्यान दळवीनगर येथे १९ नोव्हेंबरला बेकायदेशीरपणे लोहमार्गावरून जाण्याच्या प्रयत्नात एक मोटार लोहमार्गावर अडकून पडली होती. प्रत्यक्षदर्शी नागरिक व रेल्वे इंजिनाच्या चालकाच्या सतर्तकतेमुळे मोठा अपघात टळला. मोटार बाजूला घेऊन रेल्वे वाहतूक सुरळीत करण्यात आली. या प्रकरणी मोटार चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या पाश्र्वभूमीवर रेल्वेकडून नागरिकांना आवाहन करण्यात आले आहे. लोहमार्ग ओलांडण्यासाठी उड्डाणपुलांची व्यवस्था आहे. मात्र, काही ठिकाणी शॉर्टकट म्हणून बेकायदेशीर व धोकादायक पद्धतीने लोहमार्ग ओलांडला जातो. हा प्रकार रेल्वेच्या कायद्यानुसार गुन्हा आहे. त्याचप्रमाणे या प्रकारातून मोठा अपघात होण्याचाही धोका आहे. या गोष्टी टाळाव्यात योग्य पद्धतीने लोहमार्ग ओलांडावा, असे आवाहन रेल्वे प्रशासनाकडून करण्यात आले आहे. त्याचप्रमाणे अशा प्रकारे लोहमार्ग ओलांडण्याच्या प्रकारांबाबत माहिती देण्याबाबतही कळविण्यात आले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 22, 2013 2:40 am

Web Title: central rly appeals to inform about vehicles who crossess the rails unauthentickly
Next Stories
1 डॉक्टरने विनयभंग केल्याची अपंग महिला कर्मचाऱ्याची तक्रार
2 महाराष्ट्र गंधर्व नाटय़संगीत स्पर्धा जानेवारीमध्ये
3 प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी पदासाठी यावर्षी परीक्षाच नाही
Just Now!
X