News Flash

Video : चाकणमध्ये ATM फोडण्यासाठी चोरट्यांनी घडवला भीषण स्फोट; मध्यरात्री संपूर्ण परिसर हादरला

स्फोटाचा आवाज ऐकताच एटीएम असणाऱ्या इमारतीमध्येच मागील बाजूस राहणार इमारतीचा मालक तिथे आला मात्र अज्ञातांनी त्याला धमकावून घरी जाण्यास सांगितलं

पहिल्यांदाच अशी घटना घडल्याचं पोलिसांनी सांगितलं.

पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत चाकण येथे एटीएम फोडण्यासाठी स्फोट घडवून आणल्याची धक्कादायक घटना समोर आली असून बॉम्ब निकामी करणारं बीडीडीएसचे पथक देखील घटनास्थळी दाखल झाले आहे. ही घटना मध्यरात्री चाकणमध्ये ही घटना घडली असून स्फोटामुळे परिसर हादरला असल्याचं समोर येत आहे. एटीएमजवळ स्फोट घडवून आणल्यानंतर अज्ञातांनी पैसे घेऊन पोबारा केला आहे. काही विशिष्ट स्फोटके वापरून हा स्फोट घडवल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.

चाकणच्या भांबोली येथे अज्ञात चोरट्यांनी हा स्फोट करून एटीएम फोडलं आणि पैसे घेऊन चोरटे पसार झाले आहेत,अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. दरम्यान, स्फोट अत्यंत भीषण स्वरुपाचा होता. यात एटीएमचे शटर तुटले असून परिसर या स्फोटाच्या आवाजाने हादरला आहे. स्फोटाचा आवाज ऐकताच एटीएम असणाऱ्या इमारतीमध्येच मागील बाजूस राहणार इमारतीचा मालक तिथे आला. पण अज्ञात व्यक्तींनी त्यांना धमकावून परत घरी जाण्यास सांगितले. मालक देखील घाबरून घरी परत गेला. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत असून बीडीडीएसला देखील पाचारण करण्यात आले.

एटीएम फोडण्यासाठी स्फोट घडवल्याची पहिल्यांदाच घटना घडल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 21, 2021 10:24 am

Web Title: chakan blast outside atm for looting kjp 91 scsg 91
टॅग : Maharashtra
Next Stories
1 आदेश धुडकावत पुण्यात फलकबाजी
2 डिजिटल मिळकत पत्रिका डाउनलोड करण्यात मुंबई उपनगर आघाडीवर
3 समावेश कागदोपत्रीच
Just Now!
X