News Flash

चाकण खून प्रकरण : पोलिसांची भीती राहिली नसल्याने अशा क्रूर घटना घडतात- दरेकर

सामान्य नागरिकांना निर्भीडपणे जगता आलं पाहिजे, असं देखील बोलून दाखवलं

पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत एका १७ वर्षीय तरुणीचा डोक्यात दगड घालून खून केल्याची घटना नुकतीच चाकण परिसरात घडली. तिचा मृतदेह विवस्त्र अवस्थेत आढळला असल्याने सर्व स्तरातून संताप व्यक्त केला जात आहे. आज राज्याचे विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर यांनी अपर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे यांची भेट घेऊन संबंधित आरोपींवर कठोर कारवाई करावी असे सांगितले. पोलिसांची भीती राहिली नसल्याने अशा क्रूर घटना घडत आहेत, असं त्यांनी यावेळी बोलून दाखवलं.

दरेकर म्हणाले, चाकण परिसरातील  तरुणीचा खून ही माणुसकीला काळिमा फासणारी घटना आहे. महाराष्ट्र हे कायद्याचे राज्य आहे, सामान्य नागरिकांना निर्भीडपणे जगता आलं पाहिजे. म्हणून, आज अपर पोलीस आयुक्तांची भेट घेऊन अधिक या संदर्भात माहिती घेतली. तरुणीला न्याय मिळाला पाहिजे, अशी आमची  भूमिका आहे.

यावेळी दरेकर  म्हणाले, कायद्याचा धाक कमी झालेला दिसत आहे. पोलिसांची भीती राहिली नाही त्यामुळे अशा क्रूर घटना घडत आहेत. परंतु, पोलिसांवर आमचा विश्वास आहे असंही ते म्हणाले. तरुणी सोबत अघटित अस काही घडलेले नाही, असं डॉक्टरांनी सांगितले आहे. पोलीस चांगल्या पद्धतींने तपास करतील. आज चाकण परिरात जाऊन खून झालेल्या तरुणीच्या कुटुंबीयांची भेट घेतली आहे. आरोपींवर कठोर कारवाई करण्यात यावी असं नातेईकांनी हंबरडा फोडून सांगितले आहे. कायद्यापुढे कोणी मोठं नाही असा संदेश पोलिसांच्या कारवाईतून जावा, अशी अपेक्षा देखील त्यांनी व्यक्त केली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 26, 2020 9:04 pm

Web Title: chakan murder case such brutal incidents happen as there is no fear of police darekar msr 87 kjp 91
Next Stories
1 उद्धव ठाकरे यांचे आव्हान म्हणजे स्वतःच मारायचे आणि स्वतः रडायचे : प्रवीण दरेकर
2 करोनाबाधित मुलींना रुग्णालयात घेऊन जाण्यास आलेली रुग्णवाहिका कुटुंबीयांनी परत पाठवली
3 पोलिसांचा धाक नसल्याने राज्यात क्रूर घटना घडत आहेत; दरेकरांचा गृहखात्यावर निशाणा
Just Now!
X