पावसाळ्याच्या कालावधीत अनेक ठिकाणी पाणी तुंबण्याची आणि वाहतूक कोंडीची शक्यता
पुणे : पावसाळ्यात रस्त्यांवर पाणी साचून वाहतूक कोंडी होत असल्याचे सातत्याने निदर्शनास आल्यामुळे पाणी तुंबणाऱ्या आणि वाहतूक कोंडी होणाऱ्या ठिकाणांची यादी महापालिका आणि वाहतूक पोलिसांकडून करण्यात आली आहे. या यादीत काही नव्या ठिकाणांचाही समावेश करण्यात आला आहे. मात्र यादी तयार असली तरी उपाययोजनांचे काय, हा मूळ प्रश्न कायम आहे. यंदाही रस्ते दुरुस्तीची कामे अर्धवट राहिल्यामुळे पावसाळ्याच्या कालावधीत अनेक ठिकाणी पाणी तुंबण्याची आणि वाहतूक कोंडी होण्याची शक्यता आहे.
शहरात जून महिन्याच्या अखेरीस झालेल्या जोरदार पावसानंतर वडगांवशेरी परिसरासह अन्य काही भागात पाणी साचण्याच्या घटना घडल्या होत्या. गतवर्षीही सप्टेंबर-ऑक्टोबर महिन्यात अशीच परिस्थिती पुढे आली होती. महापालिके कडून दरवर्षी पाणी साचणाऱ्या ठिकाणांची पाहणी के ली जाते. आपत्ती व्यवस्थापन विभागाकडूनही पाणी साचणाऱ्या, पाण्याचा तातडीने निचरा न होणाऱ्या ठिकाणांची यादी के ली जाते. यंदाही महापालिके कडून पाहणी करून सातत्याने पाणी तुंबणारी ठिकाणे निश्चित करण्यात आली आहेत. यामध्ये प्रामुख्याने मध्यवर्ती भागासह, उपनगरातील काही भागांचा समावेश आहे. मात्र दरवर्षी पावसाळ्याच्या तोंडावर यादी होते आणि उपाययोजना कागदावरच राहतात, हे चित्र यंदाही कायम राहण्याची शक्यता आहे.
जंगली महाराज रस्ता, फग्र्युसन रस्ता, आपटे रस्ता, कर्वे रस्ता, गणेश खिंड रस्ता, मॉडर्न महाविद्यालय रस्ता, कोथरूड येथील आठवले चौक, राजाराम पूल, पॉवर हाऊस चौक, सेंट मिराज कॉलेज, स्वारगेट परिसरातील जेधे चौक, व्होल्गा चौक, डायस प्लॉट, मार्के टयार्ड चौक, दत्तवाडी येथील भाग, सिंहगड रस्त्यावरील राजाराम पूल, वडगांव पूल, धायरी फाटा, सहकारनगर परिसरातील शारदा आर्के ड चौक, भारती विद्यापीठ परिसरातील कात्रज दूध संघ, धनकवडी फाटा, अहिल्यादेवी चौक, चतु:शृंगी परिसरातील औंध गाव, वेताळबाबा चौक, ब्रेमेन चौक, सेनापती बापट रस्ता, सिंध हौसिंग सोसायटी परिसर, लुल्लानगर चौक, फिनिक्स मॉल, हडपसर, गाडीतळ या भागात पाणी साचत असल्याचे निदर्शनास आल्यामुळे या भागातील यादी तयार करण्यात आली आहे.
दरवर्षी एप्रिल- मे महिन्यात महापालिके कडून विविध सेवा वाहिन्या टाकण्यासाठी खासगी कं पन्यांसह शासकीय यंत्रणांना रस्ते खोदाईची मान्यता दिली जाते. तर मे महिन्याच्या मध्यानंतर रस्ता पूर्ववत करण्याची कामे के ली जातात. मात्र ही कामे मुळातच पावसाळ्याच्या तोंडावर होत असल्यामुळे ती अर्धवट राहातात हे वास्तव आहे. पावसाळ्यात पाणी साचू नये यासाठी रस्त्यावरील खड्डे बुजविणे, रस्त्यांवरील चेंबर्सची दुरुस्ती करणे, पाण्याचा निचरा होणारी पावसाळी गटारे स्वच्छ करणे अशी कामे महापालिके कडून करण्यात येत असल्याचा दावा होतो. मात्र दरवर्षी याच ठिकाणी पाणी साचून वाहतूक कोंडी होत असल्याचे चित्र पुढे येते.
गेल्या वर्षीतर सप्टेंबर-ऑक्टोबर महिन्यात सातत्याने हा अनुभव नागरिक आणि वाहनचालकांना आला. या पाश्र्वभूमीवर यंदा पोलिसांच्या मदतीने महापालिके ने यादी तयार के ली आहे. पाणी साचू नये यासाठी उपाययोजना करण्यात येत असल्याचा दावाही करण्यात आला आहे. मात्र तो कागदावरच राहणार का, हे येत्या काही दिवसांतच स्पष्ट होणार आहे.
गतवर्षीच्या काही भागांचा समावेश
शिवाजीनगर, कोथरूड, कोरेगांव पार्क, लष्कर, स्वारगेट परिसर, दत्तवाडी, सहकारनगर, वानवडी या भागातील सातत्याने पाणी साचणारी जुनी ठिकाणे नव्या यादीतही आहेत. गेल्या कित्येक वर्षांपासून के वळ तकलादू उपाययोजना महापालिका प्रशासनाकडून के ल्या जात आहेत. त्यामुळे वाहतूक कोंडीही होत आहे.
स्मार्ट सिटी अंतर्गत रस्त्यांचे सर्वेक्षण करण्यात आले आहे. पोलिसांकडूनही पाणी तुंबणारी आणि वाहतूक कोंडीच्या ठिकाणांची यादी घेतली आहे. क्षेत्रीय कार्यालयाशीही समन्वय साधण्यात आला आहे. त्याअंतर्गत रस्त्यावरील चेंबर्स, पावसाळी गटारे यांची साफसफाई करण्यात आली आहे. काही जुन्या ठिकाणी सातत्याने पाणी साचत आहे, ही वस्तुस्थिती आहे. मात्र यंदा कामे करण्यात आली आहेत.
– व्ही. जी. कु लकर्णी, अधीक्षक अभियंता, पथ विभाग
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on July 10, 2020 2:43 am