News Flash

ज्याच्या हाती वाढणं असतं तो आपल्या माणसाला जास्तच वाढतो : चंद्रकांत पाटील

आदित्य ठाकरेंवरून महाविकासआघाडीला लगावला टोला; आपसातील विसंवादामुळे हे सरकार लवकरच पडेल, असं देखील म्हणाले आहेत.

ज्याचा हातामध्ये वाढण असत, तो आपल्या माणसाच्या ताटामध्ये जास्त वाढतो तस आदित्य ठाकरे यांना खुश करण्यामध्ये अजित पवारांसह सर्वांचं भल आहे, असा टोला भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी महाविकास आघाडी सरकारला लगावला आहे. पिंपरी-चिंचवडमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. तसेच, महाविकास आघाडीचे सरकार आम्ही पाडणार नाही, ते त्यांच्या विसंवादामुळे लवकरच पडेल असेही त्यांनी यावेळी सांगितले.

चंद्रकांत पाटील म्हणाले की, आदित्य ठाकरे हे पर्यटन मंत्री आहेत त्यामुळे मुंबईमधील ८ हजार कोटींची वरळी डेअरी येथील जागा प्रेक्षणीय स्थळ म्हणून विकसित करण्यासाठी दिली आहे. शिवाय त्यासाठी १ हजार कोटी रुपये देखील दिले आहेत. ८ आणि ९ हजार कोटीमध्ये महाराष्ट्राचा अख्खा दुष्काळ निघतो. त्यात टँकर, गुरांच्या छावण्या, नुकसान भरपाई द्यायची असते. वरळी येथील कोट्यवधींची जागा ही प्रेक्षणीय स्थळासाठी देणार? आणि त्यावर एक हजार कोटी खर्च करणार. एक हजार कोटी काढले कुठून? त्याचं डिझाइन तयार नाही, डीपीआर तयार नाही, इस्टिमेट तयार नाही, आणि हे एक हजार कोटी म्हणत आहेत. कोणी ठरवले एक हजार कोटी? असं पाटील म्हणाले.

बजेटमध्ये अशा खोटी गोष्टी ज्या कधी होणार नाहीत. केवळ घोषणा करायच्या लोकांना दाखवायचं की आम्ही हे केलं ते केलं आहे. साधारण ९३ तासाच अधिवेशन आणि त्यात मुलभूत प्रश्नांना हात न घालता आपल्या राजकीय सोयी ज्या आहेत त्या पटापट करून घेणे असं हे अधिवेशन झालं आहे अस पाटील म्हणाले.

आम्ही कोणताही शोध लावत नसून प्रखर विरोधी पक्ष म्हणून काम करत आहोत. परंतु, हे मी वारंवार म्हटलंय, आज पुन्हा म्हणेल हे सरकार आम्ही पाडणार नाही आम्ही ज्योतिरादित्य शिंदे शोधणार नाही. पण आपापसातील विसंवादामुळे हे सरकार लवकरच पडेल.

करोनाचे संकट लवकर टळो, करोना टेस्टचा जो रिपोर्ट येत आहे, त्याच्या वेळेचे प्रमाण कमी करता यावं, यासाठी राज्यशासन, केंद्रशासन प्रयत्न करत आहे. जास्तीत जास्त रुग्णालयांना परवानगी द्यावी अस आमचं म्हणणं आहे. मात्र अजून यातील निर्णय झाला नाही. हा विषय नवीन आहे अस पाटील म्हणाले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 15, 2020 8:27 pm

Web Title: chandrakant patil criticizes mahavikas aaghadi government msr 87 kjp 91
Next Stories
1 #coronavirus : पिंपरी-चिंचवडमध्ये आढळला आणखी एक रुग्ण
2 Coronavirus : चंद्रकांत पाटलांनाच आदेशाचा विसर; घेतली शेकडो पदाधिकाऱ्यांची बैठक
3 करोनाबाधित रुग्णावर किंवा त्यांच्या कुटुंबावर बहिष्कार टाकल्यास कारवाई करणार
Just Now!
X