राज्यपाल भाजपाला झुकतं माप देतात अशी चर्चा याबाबत चंद्रकांत पाटील यांना विचारलं असता मी त्यावर बोलणार नाही, राज्यपालपदाची एक गरिमा असते ती राखली गेली पाहिजे असं उत्तर चंद्रकांत पाटील यांनी दिलं आहे. राज्यपाल भाजपाला झुकतं माप देतात अशी चर्चा करणारे ती गरीमा राखत नाहीत असाही टोला चंद्रकांत पाटील यांनी लगावला. पुण्यात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. पुण्यातल्या पत्रकार परिषदेत त्यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केलं.

विधान परिषदेच्या जागेवरून अनेक नावे पुढे येत आहे. मात्र राज्यपाल हे तेथील खुर्चीत बसून भाजपाची भूमिका मांडत आहे. यावरून सोशल मीडियावरून चर्चा रंगली आहे. त्या प्रश्नावर चंद्रकांत पाटील थेट पत्रकाराच्या प्रश्नावर म्हणाले की तुम्हाला उमेदवारी देऊ का अशी थेट ऑफर दिली. तर त्याबाबत राज्यपालांनाच विचारा मी त्यावर बोलणार नाही. राज्यपालपदाची गरिमा राखली गेली पाहिजे, अशी चर्चा करणारे ती राखत नाही.मात्र राज्यपालबाबत असे मी असे बोलणार नाही असंही चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे.

उद्धव ठाकरेंवर टीका

मराठा आरक्षण असो किंवा इतर विषय हे सरकार अभ्यास करत नाही,  कोणाचाही सल्ला घेत नाही. ‘हम करे सो’ कायदा हे असं या ठाकरे सरकारचं धोरण आहे. तसंच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे बाहेर पडायलाही तयार नाहीत असंही चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे.

विद्यार्थी फी, मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर दोन्ही राजे बोलताना दिसत नाहीत. या प्रश्नावर चंद्रकांत पाटील म्हणाले की, दोन राजे खासदार असलेल्या पक्षाचा मी प्रदेश अध्यक्ष आहे. त्यामुळे मी बोललो म्हणजे सगळे खासदार, आमदार बोलले.