पुणे- नाशिक येथील सिंहस्थ कुंभमेळ्यातील शाहीस्थान शनिवारी होत असल्याने या भागात होणारी भाविकांची गर्दी लक्षात घेता पुणे शहरातून नाशिकच्या दिशेने जाणाऱ्या जड वाहनांच्या वाहतुकीमध्ये २८ ते ३० ऑगस्ट या कालावधीत बदल करण्यात येणार असल्याचे वाहतूक शाखेकडून कळविण्यात आले आहे.
पुणे, सुरत, अहमदाबादकडे जाणाऱ्या अवजड वाहनांनी पुणे, अहमदनगर, औरंगाबाद, अिजठा, जळगाव, धुळे, साक्री, नवापूर, सुरत या मार्गाने जावे. िपपरी-चिंचवड, भोसरी येथून जाणाऱ्या जड वाहनांनी नाशिक रस्त्याचा वापर न करता नाशिकफाटा, होळकर पूल, शास्त्रीनगर चौक, नगर रोड या मार्गाचा वापर करावा. कोल्हापूरकडून नाशिकडे जाणाऱ्या व पुणे-सासवड, पुणे-सोलापूर रस्त्यावरून नाशिककडे जाणाऱ्या वाहनांनी कात्रज बाह्य़वळण मार्ग-हडपसर, मगरपट्टा रस्ता, खराडी बायपासने उजवीकडे वळून वाघोली-शिक्रापूरमार्ग अहमदनगरकडे जावे किंवा पुणे-सोलापूर रस्त्याने तसेच पुणे सासवड रस्त्याने पुढे जेजुरी, चौफुला, शिक्रापूर रस्त्याने इच्छितस्थळी जावे. सोलापूरहून नाशिककडे जाणाऱ्या वाहनांनी टेंभुर्णी-करमाळा- अहमदनगर रस्त्याने इच्छितस्थळी जावे.