वाहनशुल्काच्या नावाखाली पाचपट दराने आकारणी

पुणे : सिंहगड रस्त्यावरील महापालिकेच्या पु. ल. देशपांडे उद्यानात येणाऱ्या नागरिकांकडून वाहनशुल्कापोटी तब्बल पाच पट दराने शुल्क आकारणी होत असल्याची धक्कादायक बाब पुढे आली आहे. दुचाकीसाठी दोन रुपये प्रतितास शुल्क असताना प्रतितास पाच रुपये आणि शनिवार-रविवार सुट्टीच्या दिवशी प्रती तासासाठी दहा रुपये शुल्क आकारले जात असल्याची तक्रार नागरिकांकडून करण्यात आली आहे.

Puppy beaten, Pimpri,
Video : पिंपरीत श्वानाच्या पिल्लाला बेदम मारहाण; गुन्हा दाखल, मारहाण करतानाचा व्हिडिओ व्हायरल
raj kundra properties
ईडीकडून शिल्पा शेट्टीच्या पतीची संपत्ती जप्त; कथित ६६०० कोटींची बिटकॉइन फसवणूक काय?
Leopard Vasai Fort
वसई किल्ल्याजवळ प्रथमच बिबट्याचे दर्शन, वनविभागाची कॅमेरा ट्रॅपच्या माध्यमातून शोधमोहीम सुरु
question mark on quality of work done by municipality synthetic track was laid in five days
पिंपरी : पालिकेच्या कामाच्या दर्जाविषयी प्रश्नचिन्ह, पाच दिवसांत उखडला सिंथेटिक ट्रॅक

महापालिकेच्या वतीने सिंहगड रस्त्यावर पु. ल. देशपांडे उद्यानाची निर्मिती करण्यात आली आहे. हे उद्यान परिसरासह शहराच्या अन्य भागांतील नागरिकांचेही आकर्षण ठरले असून येथे सकाळ-संध्याकाळ फिरावयास येणाऱ्या नागरिकांची संख्याही मोठी आहे. मात्र गेल्या अनेक दिवसांपासून उद्यानात येणाऱ्या नागरिकांची वाहनशुल्काच्या नावाखाली नियमितपणे लूट होत असून नागरिकांनी या विरोधात तक्रार दिली आहे. त्यामुळे महापालिकेच्या वाहनतळात मनमानी पद्धतीने होत असलेल्या शुल्क आकारणीचा मुद्दाही पुढे आला आहे.

गेल्या रविवारीही असाच प्रकार झाला. त्याबाबतची माहिती समाजमाध्यमातूनही प्रसारित करण्यात आली आहे. विशेष म्हणजे ठेकेदाराकडून देण्यात येत असलेल्या पावतीवरील शुल्क दिसणार नाही, अशा पद्धतीने पावतीवर शिक्का मारला जात असल्याचेही निदर्शनास आणून देण्यात आले आहे. तसेच पावतीवर वेळेचीही नोंद केली जात नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

दरम्यान, यासंदर्भात महापालिकेच्या भूमी-जिंदगी विभागाचे उपायुक्त राजेंद्र मुठे यांच्याकडे विचारणा केली असता ठेकेदाराकडून मनमानी पद्धतीने शुल्क आकारणी होत असल्याच्या तक्रारी असतील तर उद्यानात जाऊन पाहणी करण्यात येईल आणि संबंधित ठेकेदारावर योग्य ती कारवाई करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.

शहरातील वाहतुकीला शिस्त लागावी आणि रस्त्यावरील गाडय़ांची संख्या कमी व्हावी या हेतूने महापालिकेने वाहनतळ धोरणाला मंजुरी दिली होती. या धोरणाअंर्तगत दुचाकी आणि चारचाकी गाडय़ांकडून आकारण्यात येणाऱ्या भरमसाठ शुल्कामुळे धोरणाला विरोध झाला आणि प्रायोगिक तत्त्वावर शहरातील पाच रस्त्यांवर या धोरणाची अंमलबजावणी करण्यासाठी आणि दर निश्चित करण्यासाठी महापौर मुक्ता टिळक यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करावी, असा धोरणात्मक निर्णय घेण्यात आला होता. मात्र अद्यापही दर निश्चित झाले नसून प्रायोगिक पाच रस्त्यांची निवडही लांबणीवर पडली आहे. ही परिस्थिती असताना वाहनतळ धोरणातील तरतुदींचा आधार घेत ठेका संपलेल्या वाहनतळ ठेकेदारांकडून जादा शुल्क आकारणी करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला असून त्याची अंमलबजावणीही सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे वाहनशुल्काच्या नावाखाली नागरिकांची लूट होत असल्याचेही स्पष्ट झाले आहे.

तासिका पद्धतीने शुल्क आकारणी

महापालिकेच्या मुख्य सभेने वाहनतळांना मंजुरी दिली आहे. महापालिकेने केलेल्या ठरावानुसार वाहनतळांचे दर वाढविण्यात आले आहेत. यापूर्वी वाहनतळांवर दिवसासाठी किंवा मासिक दराने शुल्क आकारणी होत होती. मात्र आता तासिका पद्धतीने ती होणार आहे.