News Flash

मैत्रेय ग्रुपच्या फसवणूकप्रकरणी गुन्हा

मोकळा भूखंड किंवा साडेअकरा टक्के व्याजदराने पैसे परत करण्याचे सांगण्यात आले होते.

( संग्रहीत प्रतिकात्मक छायाचित्र )

 

  • राज्यभरातील पाच हजारजणांची फसवणूक
  • हडपसर भागातील ६७ जणांची फसवणूक

वर्षांला साडेअकरा टक्के व्याज किंवा पैशांच्या बदल्यात मोकळा भूखंड देण्याच्या आमिषाने मैत्रेय ग्रुपकडून हडपसर भागातील ६७ जणांची एक कोटी अकरा लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी पोलिसांकडून मैत्रेय ग्रुपच्या संचालकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आतापर्यंत मैत्रेय ग्रुपकडून पाच हजार गुंतवणूकदारांची फसवणूक केल्याची शक्यता पोलिसांकडून व्यक्त करण्यात आली आहे.

या प्रकरणी मैत्रेय ग्रुपचे संचालक जनार्दन अरविंद परुळेकर, वर्षां मधुसुदन सतपाळकर यांच्यासह अन्य संचालकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मनीषा शिंदे  (वय ४४, रा. गोंधळेनगर, हडपसर) यांनी या संदर्भात हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. मैत्रेय ग्रुपच्या मैत्रेय प्लॉटर्स अँड स्ट्रक्चर्स प्रा. लि. कंपनीकडून ऑक्टोबर २०१० मध्ये ठराविक मुदतीसाठी गुंतवणूक करण्याचे आमिष दाखवले होते. त्याबदल्यात मोकळा भूखंड किंवा साडेअकरा टक्के व्याजदराने पैसे परत करण्याचे सांगण्यात आले होते.

या योजनेत अनेक महिलांकडून गुंतवणूक करण्यात आली होती. दहा हजारांपासून दहा लाख रुपयांपर्यंतच्या रकमा गुंतवण्यात आल्या होत्या. या योजनेचा कालावधी पूर्ण होण्याची वेळ आली. तेव्हा फ सवणूक झाल्याचे निदर्शनास आले, अशी माहिती सहायक पोलीस निरीक्षक एस. व्ही. उमरे यांनी दिली.

मैत्रेय ग्रुपकडून ज्यांची फसवणूक करण्यात आली आहे. त्यांनी पोलिसांकडे तक्रार करावी, असे आवाहन यापूर्वी पोलिसांकडून करण्यात आले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 17, 2017 4:10 am

Web Title: cheating case against maitreya group directors
Next Stories
1 पुण्याची नवी ओळख.. संग्रहालयांचे शहर
2 कात्रज प्राणिसंग्रहालयात रीघ
3 ‘लोकसत्ता मार्ग यशाचा’मधून वेगळ्या वाटांचा शोध
Just Now!
X